Type Here to Get Search Results !

विश्व हिंदू परिषद तळोदा प्रखंड तर्फे गीता जयंती साजरी



विश्व हिंदू परिषद तळोदा प्रखंड तर्फे गीता जयंती साजरी 


 तळोदा येथे विश्व हिंदू परिषद कार्यालय येथे गीता जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला शौर्यगीत शहर मंत्री पवन शेलकर यांनी म्हटले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा मंत्री विजयराव सोनवणे यांनी केले व विषय मांडणी जिल्हा मठ मंदिर प्रमुख महेश महाराज टोपले यांनी केली ते म्हणाले की, "आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली होती. धर्मासाठी आलेले काम करावे असं ते यावेळी म्हणाले." या कार्यक्रमाला जिल्हा सेवा प्रमुख डॉक्टर शांतीलाल पिंपळे, प्रखंड सेवा प्रमुख बी एस कलाल सर, प्रखंड उपाध्यक्ष ऋषिकेश बारगड, प्रखंड विशेष संपर्कप्रमुख महेंद्र कलाल, शहर बजरंग दल सहसंयोजक दीपक तांबोळी व हिंदू जनजागृती समितीचे राहुल मराठे उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप पसायदान घेऊन करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रखंड सहमंत्री ललित पाटील यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad