Type Here to Get Search Results !

जि.प.शाळा इरेगाव येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा



जि.प.शाळा इरेगाव येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा 


आज दिनांक 3 डिसेंबर 2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इरेगाव येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त गावातील विविध अवयवाने दिव्यांग असलेल्या नागरिकांचा सत्कार सोहळा व त्यानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप यावेळी संघटनेचे तालुका प्रसिद्धीप्रमुख तथा प्रहार संघटनेचे सदस्य पत्रकार श्री दशरथ दादा आंबेकर यांच्या संकल्पनेने आयोजन करण्यात आले . त्यानिमित्ताने सर्वप्रथम गावातील दिव्यांग नागरिकांचा प्रमुख पाहुणे उपस्थित जेष्ठ नागरिक व ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व सहानुभूती नको विश्वास दाखवा याद्वारे दिव्यांग व्यक्तीचे उद्धबोधन करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सुभाष फोले सर यांनी जागतिक दिव्यांग दिनाची पाश्वभूमी व इतिहास अंत्यत मार्मिक भाषेत समाजावून सांगितला . त्यानंतर गावातील दिव्यांग नागरिकांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पेन व मोठे रजिस्टर वही वाटप करण्यात आले . यावेळी कार्यक्रमाचे येथील अध्यक्ष सरपंच अमोल गोरे प्रमुख पाहूणे पत्रकार विलास भालेराव , गजानन वानोळे , रावसाहेब कदम, शालेय व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष मारोती ऊतनुरवाड सामाजिक कार्यकर्ते गंगाधर मागीरवाड ,लक्ष्मण गायकवाड, परसराम मेटकर , वामन मिराशे , देवराव ऊतनुरवाड , कैलास फोले, बाबुराव अकुलवाड, संजय कोस्केवाड, अंगणवाडीच्या निर्मलाबाई मागीरवाड आदीची उपस्थितीती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नागेश बबीलगेवार सर यांनी केले आभार प्रदर्शन रमेश राठोड सर यांनी केले तर , शेवटी राष्टूगीत गायन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

91 इंडिया न्युज नेटवर्क प्रतिनिधी विशाल भालेराव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad