अवैध देशी दारुची विक्री करणाऱ्या वर दहीहांडा पोलीसांची कारवाई
ऐकुन 39.000 रु चा मुद्देमाल जप्त आरोपी विरुद्ध दहीहांडा पोलीस स्टेशन ला 65 ई दारुबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल
कुशल भगत अकोट
अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार ते करोडी फाट्यावरुन अवैध देशी दारुची वाहतुक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली असता करोडी फाट्यावर नाका बंदी करुन MH 30 AJ 9994 मोटारसायकल वरुन अवैध देशी दारुची वाहतुक करताना मिळुन आला आल्याने आरोपी जवळुन 100 देशी दारु बाॅटल प्रत्येकी 90 ml किंमत 4000 रुपये व एक मोटारसायकल 35.000 असा ऐकुन 39.000 रु चा मुद्देमाल जप्त करुन आरोपी विरुद्ध 65 ई दारुबंदी कायद्या प्रमाने गुन्हा दाखल केला व पुढील तपास ठाणेदार सुरेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे काॅ सुरेश ढोरे करीत आहेत