नेमसुशिल विद्यामंदिर तळोदा येथे गणितोत्सव साजरा
नेमसुशिल विद्यामंदिर तळोदा येथे भारताचे महान गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिन राष्ट्रीय गणित दिन गणितोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री. सुनिल परदेशी सर यांनी गणिताचे आपल्या जीवनातील महत्व याबद्दल मार्गदर्शन केले.तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्रीमोती विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका श्रीमती डोंगरे उपस्थित होत्या. विद्यार्थ्यानी पोस्टर प्रदर्शन चे आयोजन केले व गणित संबधी संकल्पना समजून घेतल्या. विशेष कौतुकास्पद म्हणजे गणितोत्सव चे आयोजन आणि नियोजन हे इयत्ता आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी केले. विद्यार्थ्यांना गणिताचे विषय शिक्षक सचिनकुमार पंचभाई यांनी मार्गदर्शन व प्रोत्साहित केले.
सदर उपक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री निखीलभाई तुरखीया,संचालिका सौ.सोनभाभी तुरखीया,उपाध्यक्ष श्री दगेसिंगजी महाले, सचिव श्री संजयभाई पटेल ,संस्था समनव्यक कु हर्षिल तुरखीया व विद्यामंदिराच्या सर्व शिक्षक यांनी कौतुकास्पद अभिनंदन केले.