रांझणी येथे कृषिदूतांतर्फे रब्बी शेतकरी मेळावा संपन्न
तळोदा तालुक्यातील रांझणी येथे महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी अंतर्गत दोंडाईचा येथील स्वोधारक वि.का.विकासरत्न सरकारसाहेब रावल कृषि महाविद्यालयाचे कृषिदूतांमार्फत रब्बी शेतकरी मेळाव्याचे आयोजन रांझणी येथील श्री विठ्ठल-रुखमाई मंदिर परिसरात करण्यात आला होता.
या शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन तळोदा मंडळ कृषि अधिकारी रविंद्र मंचरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दोंडाईचा कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य आर.बी.राजपूत तर मार्गदर्शक म्हणून जैन कृषि विद्यालयाचे माजी प्राचार्य तथा ग्रामसेवक मुकेश कापुरे, रांझणीचे कृषि सहाय्यक प्रकाश दळवी हे होते. तसेच रांझणीचे सरपंच अजय ठाकरे, गणेश बुधावलचे सरपंच लक्ष्मीबाई नाईक, प्रतापपूरचे सरपंच कमलबाई पावरा, चिनोद्याचे सरपंच सुषमाताई नाईक, आमलाडचे सरपंच लक्ष्मीबाई पाडवी, दलेलपूरचे सरपंच राजू प्रधान, तलावडीचे सरपंच कैलास पाडवी, भंवरचे सरपंच श्रीकांत पाडवी, कार्यक्रम समन्वयक प्रा.रविंद्र देशमुख, कार्यक्रम अधिकारी प्रा.विवेक चव्हाण, प्रा.पराग बागुल आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. या रब्बी शेतकरी मेळाव्यात केळी, ऊस, हरभरा, गहू या पिकांवरील व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी हरभरा पिकाविषयी मार्गदर्शन करतांना मार्गदर्शक मुकेश कापुरे यांनी सांगितले की, जगातील एकूण हरभऱ्याच्या क्षेत्रापैकी ७८ टक्के पीक भारतात घेतले जाते. हरभऱ्याच्या दाण्यामध्ये १८ ते १९ टक्के प्रथिने असतात. हरभऱ्याचे पिक हे मध्यम किंवा मध्यम भारी जमिनीत घेतले जाते. मुख्यतः हे पीक रब्बी हंगामात ऑक्टोबरचा दुसरा ते नोव्हेंबरचा पहिला पंधरवडा या कालावधीत पेरणी करण्यात येते. तसेच हरभऱ्यासाठी हेक्टरी बियाणे व बिजप्रक्रिया, जाती किंवा वाण, खत व पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत, कीड व रोग काढणी व उत्पादन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच मंडळ कृषि अधिकारी रविंद्र मंचरे ऊस, केळी, गहू या पिकांवरील व्यवस्थापन या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तर कृषि सहाय्यक प्रकाश दळवी यांनी कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषि योजनांबाबत मार्गदर्शन केले. या कृषि मेळाव्यास रांझणी, प्रतापपूर,गणेश बुधावल, चिनोदा, दलेलपूर या गावातील शेतकरी, ग्रामस्थ तसेच रांझणी कृषि विद्यालयाचे कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर रब्बी शेतकरी मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी रांझणीचे कृषिदूत रुपेश पाटील, कृष्णकांत पाटील, कुणाल पाटील, गिरीश पाटील, शुभम उशीर, राकेश अडवल्ला, विनय मोर्थुल्ला, वेणु बाबु, चिनोद्याचे कृषिदूत प्रणव पाटील, प्रथमेश पाटील, आकाश पानपाटील, रोहित सूर्यवंशी, आर्यन पवार, श्रेयस शिंदे, प्रतापपूरचे कृषिदूत रूतुवेज वाणी, शुभम पाटील, वैभव पाटील, रोशन सावळे, अनिकेत सुर्यवंशी, रोहित वाडिले, हर्षल वसावे, कुशल सिनकर,
गणेश बुधावलचे कृषिदूत सुशांत शिंदे, सौरव पाटील, वैभव पाटील, धनराज शिंदे, भूपेश साळवे, मंगेश रवणकार, सुजित राजपूत, यश शृंगारे, दलेलपूरचे कृषिदूत राकेश पाटील, तेजस सातपुते, अजय शिंदे, मयूर राजपूत, हेमंत शिंदे, गणेश पाटील, शशिकांत पानपाटील, अनस पंजा आदी कृषिदूतांनी
आदींनी परिश्रम घेतले.