आश्रम शाळा तलावडी येथे जात प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम संपन्न.
तळोदा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत दि 14 रोजी अनुदानित आश्रमशाळा, तलावडी येथे विद्यार्थी सक्षमीकरण योजनेअंतर्गत प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की यांच्या हस्ते जात प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांना भविष्यात व्यावसायिक शिक्षणासाठी तसेच शासकीय कामांसाठी विभिन्न दाखले पुरावे यांच्या अडचणी येतात. यासाठी तळोदा प्रकल्पाने अनुदानित आश्रमशाळा, तलावडी येथे वाल्मीक पाटील यांच्या संयोजनाने इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करणे तसेच जात प्रमाणपत्र तयार करणे हे काम यशस्वीरित्या पूर्ण केले. या उपक्रमांतर्गत आज आश्रमशाळा, तलावडी येथे प्रतिनिधी स्वरूपात विद्यार्थ्यांना मंदार पत्की यांच्या हस्ते जात प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
याप्रसंगी प्रकल्पधिकारी मंदार पत्की यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात आपण आश्रमशाळांमधून मोठे व्हा ,मेडिकल इंजीनियरिंग या क्षेत्राकडे जाताना तुम्हाला सर्वप्रथम गुणवत्ते सोबतच तुमचं जात प्रमाणपत्र आवश्यक राहील .यासाठी तुमच्या भविष्यातल्या अडचणी आज आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करीत आहोत असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मनोगतात सांगितले. तसेच आश्रमशाळा तलावडी येथील विभिन्न शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांचेही प्रकल्पधिकारी मंदार पत्की यांनी कौतुक केले व येथील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापनाचे विशेष अभिनंदन केले. आश्रमशाळा तलावडी येथील विज्ञान शिक्षिका बबीता गावित यांनी आयआयटी पवई (मुंबई )येथे संस्थेच्या विज्ञान विभागाच्या अभ्यास दौऱ्याच्या नेतृत्वाचे त्यांनी विशेष कौतुक केले. आश्रमशाळा तलावडी येथील विभाग स्तरीय निवड झालेल्या खो-खो या क्रीडा प्रकारातील विद्यार्थिनींचे व क्रीडा शिक्षक अमोल पाटील यांचेही त्यांनी अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक विभागाच्या काश्मीरा पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रकाश साळुंखे यांनी संस्थेच्या विभिन्न सहशालेय उपक्रमांचे निवेदन केले. संपूर्ण उपक्रमांचे एकत्रित आयोजन आणि संयोजन आणि गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन या संस्थेच्या विशेष उल्लेखनीय बाबी त्यांनी नमूद केल्या. कार्यक्रमाची सांगता दिलीप पाटील यांनी ऋणनिर्देश व आभार प्रदर्शनाने पूर्ण केली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अधिक्षक प्रवीण वसावे, दशरथ पाडवी , धनश्री अजगे, साईनाथ वळवी , नीता पावरा, अलका तिडके, राहुल जोशी, विजय मलाये इत्यादींनी परिश्रम घेतले