Type Here to Get Search Results !

52 ग्रामपंचायत निवडणूकीसाठी 169 मतदान यंत्रे सिलिंग प्रक्रिया पूर्ण



तालुक्यातील 52 ग्रामपंचायत निवडणूकीसाठी 169 मतदान यंत्रे सिलिंग प्रक्रिया पूर्ण



किनवट : बुधवार (दि.14 ) रोजी तहसिल कार्यालयात तयार केलेल्या विशेष कक्षात रविवार (दि.18 ) रोजी होणाऱ्या तालुक्यातील 52 ग्रामपंचायत निवडणूकीसाठी 169 मतदान केंद्रासाठीची मतदान यंत्रे सिलिंग प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

        निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार डॉ. मृणाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार मोहम्मद रफीक , मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे व मल्लिकार्जून स्वामी यांनी 13 टेबलवर 13 फेर्‍यामध्ये मतदान यंत्राला मतपत्रिका लावून निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावरील सिलिंग प्रक्रिया पूर्ण करवून घेऊन मतदान घेण्यासाठी मतदान यंत्रे तयार केलीत. यावेळी रोऑफिसर म्हणून मंडळ अधिकारी एम. डी. वांगीकर व दाऊदखान यांनी काम पाहिले. 52 ग्रामपंचायतीच्या 146 प्रत्यक्ष मतदान केंद्रासाठी व 23 राखीव मतदान यंत्रे निवडणूकीसाठी सज्ज करण्यात आली आहेत.

        ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी निवडणूक विभागाचे नितीन शिंदे, व्ही. टी. सूर्यवंशी, संदीप पाटील, आदिंसह सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, मास्टर ट्रेनर, तलाठी, कोतवाल, शिपाई  यांनी परिश्रम घेतले.

91 इंडिया न्युज नेटवर्क प्रतिनिधी विशाल भालेराव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad