शहादा वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगरपालिका हद्दीतील पाच कोटी तसेच ग्राम विकास जनसुविधा योजना अंतर्गत पालिका हद्दीबाहेरील नवीन वसाहतीतील सुमारे दोन कोटी रुपये अशा सात कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांचे भूमिपूजन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी शहादा शहर व परिसरातील विकासासाठी एकूण 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे यातील पहिल्या टप्प्यात पाच कोटी रुपयांची विकास कामे शहरात सुरू करण्यात आले असून मंगळवारी सात कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले आगामी आठ दिवसांच्या कालावधीत आणखी तीन कोटी रुपयांचा खर्चाच्या विकास कामाचे भूमिपूजन करण्यात येणार असून आगामी महिन्याभराच्या कालावधीत दहा कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी दिली
सदरचे विकास कारणेही नगर विकास खात्याच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत तसेच ग्रामविकास विभागाच्या ग्रामविकास जन सुविधा योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आले आहेत
विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे चेअरमन दीपक पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील ,भाजपा जिल्हा सरचिटणीस जितेंद्र जमदाडे ,के डी पाटील, भाजपा शहराध्यक्ष विनोद जैन तालुका कार्याध्यक्ष डॉ किशोर पाटील, डॉ योगेश चौधरी, आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत वसावे ,सरचिटणीस हितेद्र वर्मा, रमाशंकर माळी, जमादार सर ,कमलेश जांगिड, गोपाल गांगुर्डे ,प्रदीप ठाकरे, प्रशांत कुलकर्णी प्रशांत कदम अक्षय अमृतकर,वैभव सोनार ,जैकी शिकलीकर, भावनाताई लोहार, नंदाताई सोनवणे ,पाठकताई, नगरसेविका विद्याताई जमदाडे, भुऱ्या पवार ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील,घनश्याम पाठक,किरण सोनवणे, रुपेश पाटील ,सचिन पावरा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते