शहादा तालुक्यात चार पाझर तलावांच्या दुरुस्तीच्या कामांचे भूमिपूजन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते
राज्य शासनाने मुख्यमंत्री जलसंधारण योजनेतून शहादा तालुक्यातील पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी चाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून आज तालुक्यातील चार पाझर तलावांच्या दुरुस्तीच्या कामांचे भूमिपूजन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले
तालुक्यातील पाझर तलावांची दुरावस्था झाल्याने हे तलाव कुचकामी ठरले होते पावसाळ्यात येथे पाणी आडविण्यात व साठवण्यात यश येत असले तरी ठिकठिकाणी हे तलाव फुटल्यामुळे पाणी वाहून जात होते परिणामी पावसाळ्यानंतर या तलावाचा कुठलाही उपयोग परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी तर ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्यासाठी होत नव्हता परिणामी या तलावाची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील नागरिकांनी केली होती
शेतकरी व नागरिकांच्या या मागणीची दखल घेत आमदार राजेश पाडवी यांनी गेल्या दोन वर्षापासून शहादा तालुक्यातील पाझर तलावांच्या दुरुस्तीसाठी शासनाने तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करत वेळोवेळी पाठपुरावा केला होता आमदार पाडवी यांच्या पाठपुराव्याला यश आले असून राज्य शासनाने मुख्यमंत्री जलसंधारण योजनेअंतर्गत शहादा तालुक्यासाठी दोन कोटी चाळीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे
राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिल्यानंतर शुक्रवारी सकाळी शहादा तालुक्यातील मानमोड्या येथील दोन व मलगाव,कमरावद येथील प्रत्येकी एक अशा चार पाझर तलावाच्या दुरुस्तीच्या कामाचे भूमिपूजन राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले आहे तालुक्यातील ज्या ठिकाणी पाझर तलाव, साठवण बंधारे यांची दुरावस्था झाली असेल अशा ठिकाणच्या नागरिकांनी आमदार संपर्क कार्यालयात माहिती द्यावी त्यांच्याही दुरुस्तीसाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करून लवकरच निधी उपलब्ध करून घेऊ व त्यांची दुरुस्ती युद्ध पातळीवर करण्यात येईल याबाबत नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन आमदार राजेश पाडवी यांनी यावेळी केले या वेळी भाजपा तालुका कार्यअध्यक्ष डॉ किशोर पाटील शहरअध्यक्ष विनोद जैन ,भाजपा माजी जिल्हाउपाध्यक्ष दिनेश खंडेलवाल,योगेश पावरा,प्रवीण वाळवी,किशोर मराठे ,सुभाष पटले,संरपंच अमित पाडवी,सुखराम पावरा, घनश्याम मराठे,चव्हाण सर,संरपच शांताराम खर्डे ,दिलवर गिरासे,संरपच संजय माळी,गोरख शिंदे, कमल पावरा,स्विय्य सहाय्यक हेमराज पवार,अभियतां निलेश पाटील कत्राटदार के के पाटील व गावकरी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.