Type Here to Get Search Results !

लातूर - मुरुड - बार्शी - टेंभुर्णी रस्त्याच्या चौपदरीकरण कामास तात्काळ मंजूरी



अत्यंत महत्वाच्या अशा लातूर - मुरुड - बार्शी - टेंभुर्णी रस्त्याच्या चौपदरीकरण कामास तात्काळ मंजूरी देण्याच्या सूचना मा श्री नितीनजी यांनी संबंधितांना दिल्या.!


औसा मतदारसंघासह लातूर जिल्ह्यातील विकासकामांसाठी आज देशाचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा श्री नितीनजी गडकरी यांची नागपूर येथे भेट घेतली. पुणे/मुंबई पर्यंतच्या वाहतुकीसाठी लातूर जिल्ह्यासह नांदेड, धाराशिव व सोलापूर जिल्ह्यांसाठी तसेच कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांसाठी लातूर - मुरुड - बार्शी - टेंभुर्णी हा मार्ग सर्वाधिक जवळचा आणि सोयीचा आहे. सदरील रस्त्याची दयनीय अवस्था झाली असल्याने वाहन चालकांना वाहतुकीसाठी पर्यायी लांबच्या मार्गाचा अवलंब करावा लागत आहे, ज्यामुळे इंधन व वेळेचा अपव्यय होत आहे. लातूर - टेंभुर्णी रस्त्याचे वाहतुकीच्या दृष्टीने असलेले अनन्यसाधारण महत्व व रस्त्यावरील दररोजची वाहनांची वर्दळ लक्षात घेऊन सदरील रस्त्याचे चौपदरीकरण करण्यास मंजुरी देऊन प्राधान्याने काम करण्यात यावे अशी विनंती आदरणीय नितीनजी यांना केली. लातूर - टेंभुर्णी रस्त्याच्या चौपदरीकरण कामास मंजूरी देण्यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या आहेत. आदरणीय नितीनजी यांचा कामाचा धडाका पाहता सदरील कामाला लवकरच प्रत्यक्षात मंजुरी मिळेल असा विश्वास आहे.




औसा - किल्लारी - उमरगा व लातूर - निलंगा - औराद - जाहिराबाद या २ राष्ट्रीय महामार्गांना एकमेकांशी जोडणाऱ्या लामजना पाटी - निलंगा या रस्त्याला तसेच उमरगा - हैद्राबाद व निलंगा - औराद - जाहिराबाद या २ राष्ट्रीय महामार्गांना एकमेकांशी जोडणाऱ्या तुरोरी मोड - कासार सिरसी - कासार बालकुंदा - औराद या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग घोषित करून दोन्ही रस्त्यांचे चौपदरीकरण करण्यात यावे तसेच औसा शहरातून जाणाऱ्या रत्नागिरी - नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील अवजड वाहतुकीसाठी औसा शहरास बायपास रस्ता मंजूर करण्यात यावा अशीही विनंती यावेळी त्यांना केली. यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad