जव्हार मोखाडा मध्ये रोजगार नसल्याने पालक बरोबर शालेय मुलांचे ही स्थलातर खूप मोठया प्रमाणात दिसून येते
पालघर जिल्हा प्रतिनिधी:- सुनिल जाबर
जव्हार मोखाडा तालुक्यातील बहुतांश कुटुंब रोजगाराच्या शोधात जवळपासच्या जिल्ह्यात आपल्या मुलाबाळांसह स्थलांतरित होतात शेवटी पोटा पाण्याच प्रश्न , दिवाळीची सुट्टी संपली आणि शाळा सुरू झाल्या तरीही पोरासोरानी गजबजलेली कातकरी वस्ती पूर्ण रिकामी झाली होती .
जिल्हा परिषद शाळा कोचाळे आणि कीनिस्ते केंद्रातील बरीचशी मुले आपल्या पालकांच्या सोबत ठाणे , रायगड जिल्ह्यातील विटभट्यावर स्थलांतरित झाली होती , सर्वेक्षणाच्या वेळी काही पालकांचे स्थलांतरित ठिकाणचे पत्ते मिळाले ,तर काही वीटभट्टी मालकांचे फोन नंबर आत्ता काम होते विद्यार्थ्यांचा शोध घेवून जवळच्या शाळेत दाखल करण्याचे . मा. गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले साहेबांची पूर्व परवानगी घेवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली किणिस्ते केंद्राचे केंद्रप्रमुख मा. वीरकर साहेब आणिआणि कोचाळे शाळेचे मुख्याध्यापक बालरक्षक दिनकर फसाळी यांनी आज दिवसभरात जवळ जवळ २५० किलोमिटर मोटार सायकल वर रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील व ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील १२ ते १५ विटभट्या वर फिरून केंद्रातील नाही तर मोखाडा तालुक्यातील अनेक शाळांचे एकूण ३० स्थलांतरित विद्यार्थी नजीकच्या शाळेत शिक्षण हमी कार्ड देवून दाखल केले . स्थानिक शाळांच्या शिक्षक , मुख्याध्यापकांनी ही सहकार्य केले . स्वतः शाळाबाह्य स्थलांतरित विद्यार्थी ते गुरुजींच्या कृपेने केंद्रप्रमुख पदा पर्यंत पोहचलेले केंद्रप्रमुख नागू वीरकर साहेब आणि बालरक्षक दिनकर फसाळी यांनि स्थलांतरित शाळाबाह्य विद्यार्थी आणि त्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी केलेले प्रयत्न नक्कीच सत्कारणी लागेल हीच आशा .