ह. मंगेवाडीत शेख किराणास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग,आगीत 7 लाखाहून अधिक आर्थिक नुकसान
ह.मंगेवाडी प्रतिनिधी :आबासाहेब शेवाळे
सांगोला तालुक्यातील ह.मंगेवाडी गावामध्ये भर चौकात असणाऱ्या शेख किराणास पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास लाईटच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने या आगीत ,दुकानात असणारा जवळपास 7 लाखाहून अधिक च्या मालाचे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारे जीवदानी झालेली नाही. रात्री नऊच्या सुमारास शेख किरणाचे मालक इब्राहिम मोहद्दीन मोहद्दीन शेख नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद करून दुकानापासून 400 मीटर अंतरावर ती असणाऱ्या राहत्या घरी निघून गेले असता, पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास रस्त्याने जात असणाऱ्या एका वाहन चालकाने दुकानातून आगीचा धूर निघत असल्याने, आजूबाजूच्या लोकांना जागे केले. व दुकान मालकास बोलावून आणले असता, तोपर्यंत दुकानातील जवळपास 7 लाखाहून अधिकच्या मालाचे अगीत जळून खाक झालेला होता. गावातील होतकरू तरुणांनी नागरिकांनी वेळीच आगीवरती नियंत्रण आणल्याने पुढील अनर्थ टळला.