Type Here to Get Search Results !

तालुक्यातील 50 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी 146 मतदान केंदावर निवडणूकीसाठी यंत्रणा सज्ज



तालुक्यातील 50 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी 146 मतदान केंदावर निवडणूकीसाठी यंत्रणा सज्ज


सहायक जिल्हाधिकारी नेहा भोसले व तहसिलदार डॉ. मृणाल जाधव यांनी पथके केली रवाना


किनवट : रविवारी (दि.18 ) तालुक्यातील 50 ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी 146 मतदान केंद्राकरिता सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी  नेहा भोसले,भाप्रसे व निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार डॉ. मृणाल जाधव यांनी शनिवारी (दि.17 ) तहसिल कार्यालयातून पथके रवाना केली.

        निवडणूकीकरिता क्षेत्रीय अधिकारी 9, मतदान केंद्राध्यक्ष 179, मतदान अधिकारी एक 179, मतदान अधिकारी दोन 185 व मतदान अधिकारी तीन 185 असे राखीव सह 728 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.  

           या सर्वांना मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे यांनी संगणक सहायक तथागत पाटील यांच्या साथीने पॉवरपॉईंट प्रेझेन्टेशन द्वारे निवडणूक प्रशिक्षण दिले होते. तसेच मास्टर ट्रेनर मल्लिकार्जून स्वामी यांनी रमेश मुनेश्वर यांच्या साथीने मतदान यंत्रांची माहिती दिली होती. तसेच सर्व मास्टर ट्रेनर यांनी मतदान यंत्र हाताळणीचे प्रशिक्षण गजानन मंदिर परिसरात नुकतेच दिले होते.

           निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार मोहम्मद रफीक यांच्या नेतृत्वात व्ही.टी. सूर्यवंशी , एन.जी. कानगुले, विश्वास फड यांनी मतदान यंत्रे, नायब तहसिलदार अनिता कोलगणे यांच्या नेतृत्वात अव्वल कारकून, महसूल सहायक , मंडळ अधिकारी , तलाठी , कोतवाल , शिपाई यांनी साहित्य वाटप केले. 

        वाहन कक्ष प्रमुख प्रकाश टारपे व देवकते यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस 11, स्कूल बस 5, कुझूर 9 व शासकीय जीप 7 अशी वाहन व्यवस्था केली होती. गोविंद पांपटवार व पी.पी. सूर्यवंशी यांनी अल्पोपहार व चहा-पाणी याची उत्कृष्ट व्यवस्था केली. अब्दुल फारुख यांनी मतदान केंद्राकरिता कंपार्टमेंट दिले. निवडणूक विभागाचे नितीन शिंदे यांनी सर्व साहित्य व संदीप पाटील यांनी सर्व मनुष्यबळ पुरविले.

        निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी 1, पोलिस निरिक्षक 1, सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उप निरिक्षक 19 पोलिस अंमलदार 183 व होमगार्डस् 260 असा तगडा पोलिस बंदोबस्त उप विभागीय पोलिस अधिकारी विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अभिमन्यू साळुंके यांनी लावला आहे.


दृष्टीक्षेप किनवट निवडणूक :

बिनविरोध गावं 2 (बुधवार पेठ, शनिवार पेठ)

नामनिर्देशन अप्राप्त 

सकरू नाईक तांडा 

एकूण 03 गावात मतदान होणार नाही 

मतदान असलेली गावं 50

एकूण प्रभाग 146

निवडणूक लढविणारे एकूण उमेदवार 722

निवडणूक लढविणारे एकूण उमेदवार सरपंच 137

एकूण मतदान केंद्र 146

लागणाऱ्या EVM

CU किती 146

BU किती 193 

नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी 13

नियुक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी 13

पुरुष मतदार 21105

स्त्री मतदार 19316

इतर मतदार 01

एकुण मतदार 40422

बिनविरोध सरपंच 07

बिनविरोध सदस्य 77

91 इंडिया न्युज नेटवर्क प्रतिनिधी विशाल भालेराव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad