काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनिंग तांदूळ 254.75 क्विंटल नाकेबंदी तपासणीत पोलिसांनी जप्त गुन्हा दाखल
तळोदा रेशनच्या तांदूळ काळया बाजारात विक्री करण्यासाठी जात असताना पोलिसांना मिळून आला ट्रक चालका विरुद्ध पुरवठा विभागाच्या फिर्यादीवरून तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एम एच 12 एयु 7400 मध्ये नांदेड येथून 500 कट्टे एकूण वजन 254.75 क्विंटल राशनाच्या तांदूळ तीन लाख चार हजार आठशे रुपये किमतीच्या तांदूळ घेऊन आमदाबादकडे काळया बाजारात विक्रीसाठी जात असताना पोलीसांना नाकेबंदी चेकिंग दरम्यान ट्रक आढळला पुरवठा विभागाचे पुरवठा अधिकारी प्रमोद विश्वासराव डोईफोडे यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात फौ. रजिस्टर नंबर 444/ 2022 जीवनावश्यक वस्तू कायदा कलम तीन व सात प्रमाणे ट्रक चालकाचे नाव माहित नाही यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदार हे करीत आहेत