कृषी विज्ञान केंद्रात 16 वा कृषी तंत्रज्ञान महोत्सव उद्घाटन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते
नंदुरबार तालुक्यातील कोळदा येथील डॉ.हेडगेवार सेवा समिती,कृषी विज्ञान केंद्रात 16 वा कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे शहादा-तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले.
या महोत्सवात नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदेशीर शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात आमदार राजेश पाडवी विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना म्हणाले, डॉ.हेडगेवार सेवा समिती,कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रगतीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सक्षमीकरण करण्यासाठी शेती जोड व्यवसाय उभारणे आवश्यक आहे. त्या अनुषंगानेच महिला बचत आधारे लघु उद्योगांना प्रोत्साहन दिले जाईल. आणि येणाऱ्या काळात नंदुरबार जिल्हा भगर उत्पादनाच्या अव्वल स्थानी असेल, भगर नावाने नंदुरबार जिल्ह्यातील ओळख निर्माण होईल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी राणीकाजल, मोलगी,धडगाव या गावातील भगर युनिट महिला बचत गटाचा प्रमुख महिलांचा देखील सत्कार करण्यात आला.
यावेळी कृष्णदास पाटील, राजेंद्र दहातोंडे, कांता गौरी बनकर, विजय मोहिते, महेश लोंढे, डॉ.संजय बोराळे, पद्माकर कुंदे आदी मान्यवर तसेच मोठ्या संख्येने शेतकरी, विद्यार्थी, महिला बचत गटातील महिला उपस्थित होते.