जव्हार प्रतिनिधी - दिनेश आंबेकर -
जव्हार तालुक्यातील अती दुर्गम असा पिपंळशेत ग्रामपंचायत मधील कोतीमाळ या आदिवासी पाड्यात सार्वजनिक गणेशोत्सव (मोरया माझा कोपरचा) डोंबिवली पश्चिम मित्र मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत व बालदीनाचे औचित्य साधून गावातील सर्व गरीब गरजू नागरिकांना, विधवा महिलांना, बाल - वृद्धाना, विविध भेट वस्तू देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.
या मध्ये गावातील प्रत्येक कुटुंबाला थंडी पासून बचाव व्हावा यासाठी ब्लॅंकेट देण्यात आले तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ, भिस्कीट, वह्या, पेन, पेन्शन, रबल असा शालेय वस्तू वाटून सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या चेहऱ्यावर आंनद देण्याचे काम केले आहे या कार्याबद्दल समस्त नागरिकांकडून सार्वजनिक गणेशोत्सव मोरया माझा कोपरचा डोंबिवली पश्चिम मित्र मंडळाचे व त्याच्या सहकाऱ्यांचे ग्रामस्तानकडून आभार माणण्यात येत आहेत प्रसंगी या कार्यक्रमांस उपस्तित मंडळाचे मित्र परिवारातील अजय शेळके, केदार भडगांवकर, अनिल साळकर, सिद्धार्थ मणचेकर, चिन्मय किटलेकर, उमेश सुरासे, निरज साळवे, दर्पण महाजन तसेच जयवंत पोटिंदा, गणेश हिरकुडा, विलास भोवर, महेश मोंढा, कल्पेश मोरे, अनंता मोरे, संजय चिंबडा, सोनजी भोवर, गोविंद मोरे काशिनाथ गोतरणा, दिनेश मोरे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती ग्रामस्थ, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.