मुरबाड- प्रतिनीधी :- लक्ष्मण पवार
मुरबाड नगरपंचायत हद्दीतील मुरबाड - म्हसा - कर्जत या राष्ट्रीय महामार्गावरील साजई फाटा - कुणबी भवन या चौकात गतिरोधक बसविण्याची मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाचे तालुका सचिव दिलीप पवार यांनी मुरबाड नगरपंचायतकडे केली आहे. या ठिकाणी मोठ्याप्रमाणात वाहनांची वर्दल असून भरधाव वाहने जात असतात .त्यामधे काही वाहने वळणे घेऊन संभाजीनगर , माऊलीनगर व साजईकडे जात असतात तसेच साजईरोड येथिल असणाऱ्या श्रीसमर्थ बैठकीसाठी शेकडो महिला याच चौकातून पायी रस्ता ओळांडून येत -जात असतात त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे यांना पञाद्वारे केली असून लवकरच या ठिकाणी नगरपंचायच्या माध्यमातुन गतिरोधक बसविले जातील असे आश्वासन यावेळी नगराध्यक्षांनी दिले. यावेळी प्रभाग क्र. १७ च्या नगरसेविका अनिताताई दुधाळे (मार्के) समाजसेवक मनोज देसले , मनसेचे शहराध्यक्ष नरेश देसले , पञकार शंकर करडे उपस्थित होते.