मुरबाड दिनांक 25 प्रतिनिधी लक्ष्मण पवार
राष्ट्रीय होलर समाज संघचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री माणिकराव भंडगे साहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य हे समाज कल्याणासाठी खर्च केले. समाजातील कित्येक गरीब गुलामगिरीत जगणारे, अन्यायाने त्रासलेल्याना न्याय मिळवून देनारे तेही भ्रष्टाचाराच्या युगात कोणताही मोबदला न घेता लोकांचे काम हे आपले काम समजून ते निस्वार्थी पने पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसू शकत नाही . ती व्यक्ती म्हणजेच माणिकराव भंडगे
होमगार्डच्या समस्या व व्यथा जाणून घेण्यासाठी ठाणे जिल्हा कार्यालय अंबरनाथ येथे आले असता होमगार्डच्या न्याय हक्कासाठी होलर समाज संघटना खंबीर पाठीशी असल्याचे मत माणिकराव भडांगे यांनी व्यक्त केले
गेल्या कित्येक वर्षांपासून होमगार्ड आपल्या अनेक मागण्या सरकार समोर मांडन्यासाठी आंदोलन, मोर्चे, न्यायालियन युक्तिवाद इत्यादी मार्गाने प्रयत्न करत होते पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. या उलट अनेक होमगार्डस वर होमगार्ड कायदा भंग केला म्हणून त्यांच्यावर कारवाई सुरू केल्या.
भंडगे यांनी होमगार्डचा लढा हाती घेऊन होमगार्ड च्या हितासाठी मोठे पाऊलं उचलले असून सर्व प्रथम त्यांनी सन 2010 पासून विविध कारणांमुळे अपात्र केलेल्या होमगार्डसना पुन्हा संघटनेत समाविष्ट करून घेण्यासाठी भंडगे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन होमगार्डसची सारी परस्थिती सांगितली त्यावर अजितदादा पवार साहेबांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील याना आदेश देण्यात आले की होमगार्डच्या मागण्या मान्य करून कारवाही करावी. त्यावर लगेच ग्रहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सन 2010 ते 2015 पर्यंतच्या अपात्र होमगार्डना पुन्हा सेवेत घ्यावे हा आदेश काढण्यात आला असून तसे निर्देश महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक डॉक्टर बीके उपाध्याय यांनी राज्यातील सर्वच जिल्हा समादेशक अधिकारी मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था समाजसेवक अधिकारी होमगार्ड बृहन्मुंबई यांना दिले आहेत. हे सारे शक्य झाले ते फक्त आणि फक्त श्री माणिकराव भंडगे सरांमुळे,
पहिली मागणी पूर्ण झाली ही फक्त सुरुवात आहे. आजून पुढे कामे करायची आहेत. होमगार्ड संघटनेचा कायापलट केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही व सरकारला ही स्वस्थ बसु देनार नाही हे तितकेच खरे आहे. असे प्रतिपादन माणिकराव भडांगे यांनी यावेळी व्यक्त केले
यावेळी जिल्हा प्रशासकीय अधिकारी शेलार मॅडम ,केंद्र नायक गुरव सर , चौधरी सर ,यांना पुष्पगुच्छ शाळा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी भडंगे यांच्या खांद्याला खांदा देऊन काम करणारे मुंबई झोन समादेशक अधिकारी कांबळे सर हे देखील उपस्थित होते यावेळी केंद्र नायक गुरव सर यांनी सर्व माजी होमगार्ड यांना शासनाच्या निर्णयानुसार पुनर्नियुक्ती करण्याचे आश्वासन देऊन आभार मानले