Type Here to Get Search Results !

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आदिवासी विद्यार्थ्याने पटकावला राष्ट्रीय पात्रता परीक्षेत अवल क्रमांक




प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आदिवासी विद्यार्थ्याने पटकावला राष्ट्रीय पात्रता परीक्षेत अवल क्रमांक.
 
प्रतिनिधी - दिनेश आंबेकर

 मोखाडा तालुक्यातील कारेगाव येथील लक्ष्मण यशवंत ठोंबरे या आदिवासी तरुणांने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वैज्ञानिक संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय पात्रता ही परीक्षा (गणित) या विषयातून दुसऱ्या प्रयत्नास उत्तीर्ण झाला आहे या परीक्षेसाठी संपूर्ण भारत भरातून 31 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यामध्ये ठोंबरे यांनी 31 हजार विद्यार्थ्यांमधून १९६ क्रमांकाने उत्तीर्ण होत उज्वल यश संपादन करून मोखाडा तालुक्याचे व प्रामुख्याने समाजाचे नाव मोठे केलेले आहे.




 त्यामुळे त्यांच्यावर ज्ञाती बांधवांसह वर्चस्व स्तरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे. नेट म्हणजे राष्ट्रीय पात्रता परीक्षा हे भारतामध्ये प्राध्यापक व संशोधन करण्यासाठी घेतली जाते. 16 सप्टेंबर 2022 रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती, तिचा निकाल 17 नोव्हेंबर 2022 ला या परीक्षेत गणित या विषयांतून 30942 विद्यार्थी बसले होते. या परीक्षेचा निकाल 6% लागतो, तुझ्या परीक्षेत ठोंबरे यांनी अखिल भारतातून 196 क्रमांक संपादित करून उत्तीर्ण झाला आहे. 

त्याने पदवीपर्यंतचे शिक्षण जव्हार येथे तर त्या पुढील शिक्षण हे ' द इन्स्टिट्यूट टॉप सायन्स मुंबई ' येथे घेतले आहे त्यांचे हे यश आदर्शवत व कौतुकास्पद असल्याने त्याच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad