Type Here to Get Search Results !

संगीत नाटक अकादमी मार्फत दिला जाणारा अमृत पुरस्कार सुप्रसिद्ध तारपा वादक भिकल्या धिंडा यांना जाहीर.



संगीत नाटक अकादमी मार्फत दिला जाणारा अमृत पुरस्कार सुप्रसिद्ध तारपा वादक भिकल्या धिंडा यांना जाहीर.


पालघर जिल्हा प्रतिनिधी :- सुनिल जाबर


    संगीत नाटक अकादमी राष्ट्रीय संगीत, नृत्य आणि नाटक अकादमी नवी दिल्ली यांच्या कडून  नुकतीच संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार २०२२ ची घोषणा संगीत नाटक अकादमीची जनरल कौन्सिल, राष्ट्रीय अकादमी ऑफ म्युझिक, डान्स अँड ड्रामा, नवी दिल्ली, झालेल्या बैठकीत द अशोक, नवी दिल्ली येथे नोव्हेंबर २०२२ मध्ये एकमताने एकूण (७५) 

कलाकार, ज्यांचे वय ७५ वर्षांपेक्षा जास्त आहे आणि त्यांना कोणताही पुरस्कार देण्यात आलेला नाही अश्या परफॉर्मिंग आर्ट्स क्षेत्रातून त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत राष्ट्रीय सन्मान झाला नाही. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत एक वेळचा संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कारासाठी  भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या स्मरणार्थ  निवडलेले पुरस्कार विजेते संपूर्ण राष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात आणि त्यांचे आहेत विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यामधून पालघर जिल्ह्यातील वळवंडा (ता. जव्हार) येथील सुप्रसिद्ध तारपा वादक भिकल्या धिंडा ८४ वर्षीय भिकल्या धिंडा यांची निवड करण्यात आली असून संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराची रक्कम एक लाख रुपये व ताम्रपत्र आणि अंगवस्त्रम दिले जाणार आहे.          

     सुप्रसिद्ध तारपा वादक भिकल्या धिंडा यांना वडिलांकडून जन्मापासून ही कला अवगत झाली असून त्यांना तारपा बनवणे व तारपा वाजवणे हा छंद त्याने जोपासला असून तारपाचे वैशिष्ट्य म्हणजे जवळपास दहा फूट तारपा आहे. भिकल्या धिंडा यांनी आजपर्यंत अनेक ठिकाणी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी संपूर्ण देशभरात सहभागी झाले आहेत. तसेच त्यांना जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. संपूर्ण महाराष्ट्रात उत्कृष्ठ तारपा वादक म्हणून यांची ओळख आहे. त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्य हे आदिवासी संस्कृतीचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे तारपा वाद्य वाजवून युवकांना तारपा वाद्य कला जोपासण्यासाठी काम करीत आहेत. ते स्वतः तारपा वाद्य तयार करून विक्री करून स्वतःचा रोजगार निर्माण करत असतात. आज पर्यत त्यांनी आपलं आयुष्य आदिवासी संस्कृतीचे जतन आणि संवर्धनासाठी अर्पण केल्याबद्दल त्यांची कला क्षेत्रातील हा अमृत पुरस्कार साठी निवड केली असून त्यांचा हा पुरस्कार जाहीर केल्याबद्दल त्यांचे संपूर्ण पालघर जिल्ह्यातुन त्यांच्या अभिनंदनचा वर्षाव केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad