पालघर जिल्हा प्रतिनिधी:सुनिल जाबर
जव्हार:-पालघर जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागून राहिलेली दि जव्हार अर्बन कॉपरेटिव बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवार दि १३ नोव्हेंबर २०२२ रोजी मतदान झाले. या बँकेच्या निवडणुकीत ५० टक्के मतदान झाले होते. जव्हार मधील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या बँकेचे मतदान जव्हार मोखाडा, मोखाडा, विक्रमगड, मनोर, वाडा, कुडूस असे एकूण १२२०० मतदार होते. त्यापैकी ४७२७ म्हणजेच ४४.६५% मतदान झाले. यामध्ये १७ संचालक पदासाठी एकूण ३४ उमेदवार रिंगणात होते. त्यात जनसेवा व शिवनेरी पॅनल रिंगणात होते. या निवडणुकीत सर्वसाधारण १२ जागांसाठी २४ उमेदवार तर राखीव एससी, एसटीच्या १ जागेसाठी २ उमेदवार ओबीसीच्या १ जागेसाठी २ उमेदवार एन टी चे १ जागेसाठी २ उमेदवार तर महिलांसाठी राखीव असणाऱ्या २ जागांसाठी ४ उमेदवार असे एकूण ३४ उमेदवार रिंगणात उतरले होते. जव्हार येथे ८ बूथ मनोरे येथे २ बुथ खोडाळा येथे १ विक्रमगड ३ मनोर ३ वाडा १ कुडूस १ असे एकूण १९ बुथचे नियोजन सहकार विभागाने केले होते. याकरिता ९५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
आज दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीसाठी सुरुवात झाली व संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सर्व निकाल हाती आले. यामध्ये शिवनेरी पॅनल ३ उमेदवार निवडून आले तर निलेश साबरेंच्या जनसेवा पॅनलचे १४ उमेदवार विजयी झाले. यामध्ये निलेश सांबरेंच्या जनसेवा पॅनल ने अर्बन बँकेवर निरनिर्वाद असे वर्चस्व मिळवले आहे. तर शिवनेरी पॅनलच्या पराभवाचे कारण म्हणजे जुन्या जाणत्या नेत्यांना विश्वासात न घेतल्यामुळे त्यांनी प्रचाराकडे पाठ फिरवली असल्याची चर्चा जव्हार ऐकावयास मिळत आहे.