Type Here to Get Search Results !

कासट वाडी जि प गटात जलजीवन मिशन अंतर्गत सदस्य गुलाब राऊत यांच्या हस्ते २० कोटीच्या कामांचे शुभारंभ.



कासट वाडी जि प गटात जलजीवन मिशन अंतर्गत सदस्य गुलाब राऊत यांच्या हस्ते २० कोटीच्या कामांचे शुभारंभ.


जव्हार प्रतिनिधी - दिनेश आंबेकर.

जव्हार - पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भाग आणि अतिदुर्ग भागात वास्तव्य असलेले रहिवासी यांना चार महिने पावसाळा संपला की पाण्यासाठी मोठ्या शर्तीने पाणी आणावे लागत असायची अनेकदा डोंगरदर्‍यातून पाणी आणताना जीवाला मुकावे लागले आहे, या बाबींचा विचार करत पालघर जिल्हा परिषदेच्या कासट वाडी गटात जलजीवन मिशन अंतर्गत वीस कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य गुलाब राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.

जल जीवन मिशन योजनेतुन लोकसंख्येनुसार, प्रत्येक घरात पुरेसे पिण्यायोग्य व वापरा करिता पाणी उपलब्ध होणार आहे.पाण्यासाठी झालेल्या अनेक वर्षांच्या वनवासाला पूर्ण विराम मिळणार असून, जल जीवन मिशन योजनेतून खालील गावांना पाणीपुरवठा होण्याकरिता योजना सुरू करण्यात आली आहे,


यात चांभारशेत - (५ पाच कोटी), आकरे - (५ पाच कोटी), हाडे - (१.५० दीड कोटी), खरोंडा- (३.५० साडेतीन कोटी), तिलोंडा - ( ५ पाच कोटी) चे हे काम असून, महाराष्ट्र राज्य व केंद्रीय जल जीवन मिशन योजनेतून

सुरवात झाली आहे.


केंद्र व राज्य शासनाने सुरु केलेल्या या जल जीवन मिशन योजनेतून हर -घर पाणी योजनेचा लाभ हा गाव, खेडोपाड्यातील चांभारशेत, आकरे, हाडे, खरोंडा, तिलोंडा ह्या सर्व गावांतील कुटुंबांना घरोघरी नळ कनेक्शन देवून घरा-घरात पाणी मिळणार आहे. 



या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती गुलाब विनायक राऊत, माजी सभापती सीताराम पागी, माजी पंचायत समिती सदस्य विनायक राऊत, पंचायत समिती सदस्या- मिरा गावित, मंगला कान्हात, 


लोकनियुक्त सरपंच कल्पेश राऊत, तसेच पिंपळशेत, चांभारशेत, तीलोंडा या ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच सुलोचना चौधरी ग्रामपंचायतीचे सदस्य - कुणाल सापटा, राजश्री टोकरे, बाळू भोये, त्रिंबक रावते, नितीन टोकरे तसेच नामदेव खिरारी, पपू होळकर, राजू भोये, राहुल शेंडे, गावाचे सर्व मित्र मंडळी व अन्य सदस्य मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad