लोक सहभागातून शाळेचा विकासहि संकल्पना राबवा -प्रदीप वाघ.
प्रतिनिधी - दिनेश आंबेकर.
मोखाडा :- आज खोडाळा भागतील विविध केंद्रस्तरावरील शिक्षण परीषदांना संबंधित करताना श्री प्रदीप वाघ उपसभापती यांनी शिक्षकांना आवाहन केले आहे की जनतेच्या व पालकांना बरोबर घेऊन लोक सहभागातून शाळेचा विकास साधला पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत.
आज पाचघर शाळेचे मुख्याध्यापक श्री वाघमारे सर यांनी विशेष आयोजन करुन शिक्षण परिषद कार्यक्रम भव्य दिव्य स्वरुपात घेतला.मुलांनी लेझीम पथक तयार करून मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी ग्रामपंचायत पंचायत चे नवनिर्वाचित सरपंच श्री नरेंद्र येले व उपसरपंच परशुराम अगिवले व सदस्य यांनी शाळेला मोठ्या स्वरूपात क्रिडा साहित्य व इतर बाबी उपलब्ध करून दिल्या बद्दल सर्वींनी विशेष कौतुक देखील केले.वाकडपाडा केंद्राची शिक्षण परिषद कामडवाडी शाळेत पावरा सर, यांनी आयोजन केले तसेच पाथर्डी केंद्राची शिक्षण परिषद पाथर्डी येथे श्री युवराज पाटील सर यांनी विशेष परिश्रम घेऊन आयोजित केली होती.
यावेळी श्री प्रदीप वाघ उपसभापती, सरपंच नरेंद्र येले, सरपंच लता वारे, उपसरपंच श्री नंदकुमार वाघ, उपसरपंच श्री परशुराम अगिवले पत्रकार गणेश वाघ, युवा नेते अशोक वाघ, अंकुश वाघ, विस्तार अधिकारी श्री नंदकुमार वाघ, रामचंद्र विशे साहेब, केंद्रप्रमुख नागु विरकर संजय वाघ, पांडुरंग वारे, गणेश खादे, शंकर भले माजी उपसभापती,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, ग्रामपंचायत चे सदस्य व मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते.