टाकली येथे कृषि विभाग व आत्मा तळोदा मार्फत किसान गप्पा गोष्टी कार्यक्रम
तळोदा, दिनांक 29/11/2022
आज तळोदा तालुक्यातील टाकली येथे नंदूरबार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्र्वर, शहादा उपविभागीय कृषि अधिकारी तानाजी खर्डे व तळोदा तालुका कृषि अधिकारी नरेंद्र महाले यांच्या मार्गदर्शनाखाली आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषि विभाग व आत्मा तळोदा मार्फत किसान गप्पा गोष्टी कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाला नंदुरबार शासकीय कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.यु.बी.होले, सहाय्यक प्राध्यापक डॉ .महेश भारती, मंडळ कृषी अधिकारी रविंद्र मंचरे, कृषी पर्यवेक्षक जगदीश शिरसाठ, चंद्रप्रकाश पावरा ,कृषी सहाय्यक शिलदार पावरा, दीपक पावरा , रामदास पावरा, सचिन पाडवी, आर ए पवार, सायसिंग पाडवी व आत्माचे विपुल चौधरी उपस्थित होते.
यावेळी डॉ. यु.बी.होले यांनी आंबा पीक लागवड व त्याचा वर येणाऱ्या कीडींचे नियंत्रण जैविक पद्धतीने कसे करावे या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व महेश भारती यांनी आंबा पासून प्रक्रिया करून घेण्यात येणारे विविध प्रक्रिया उद्योग बाबत माहिती दिली , तसेच रवींद्र मंचरे यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना तसेच फळबाग लागवडीसाठी मनरेगा व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना बाबत माहिती दिली व PMFME योजने मार्फत आमचूर व आंबा कँडी बाबत माहिती दिली. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवाहन केले.
कार्यक्रमाच्या वेळी यशस्वी पणे आंबा लागवड करण्यात आलेल्या रतीलाल पावरा व स्वरूपसिंग पावरा यांचा सत्कार डॉ.यु.बी.होले सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय नंदुरबार मार्फत करण्यात आला व रतीलाल पावरा यांनी आंबा लागवड करताना आलेल्या अडचणी व त्यांवर केलेल्या उपाययोजना यांबाबत अनुभव शेतकऱ्यांना सांगितले.
मौजे टाकली येथे कृषि विभाग तळोदा येथील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी व उपस्थित शेतकरी यांनी श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.शिलदार पावरा यांनी केले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विपुल चौधरी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय तळोदा मधील सर्व कृषि सहाय्यक यांचे सहकार्य लाभले.