Type Here to Get Search Results !

अक्कलकुवा तालुक्यातील 31 ग्रामपंचायतींच्या प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला ११: ०० वा सुरवात



अक्कलकुवा तालुक्यातील 31 ग्रामपंचायतींच्या प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला आज सकाळी 11 वाजेपासून अक्कलकुवा तहसिल कार्यालयाच्या आवारात प्रारंभ झाला आहे.


आज पहिल्या दिवशी सरपंच पदासाठी एकुण 9 तर सदस्य पदासाठी 5 उमेदवारांनी  नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत.

   नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यासाठी तहसिल कार्यालयात ग्रामपंचायत निहाय स्वतंत्र टेबल व यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.31 ग्रामपंचायतीचे  107 प्रभागा साठी ही निवडणूक होत असुन 31 थेट लोकनियुक्त सरपंच व 303 सदस्य निवडून द्यायचे आहेत.

   आज पहिल्या दिवशी थेट सरपंच पदासाठी भाबलपुर ग्रामपंचायतीतून दोन तर घंटांनी भगदरी, अलीविहीर, वाडीबार, कुवा, बेडाकुंड, अक्कलकुवा या ग्रामपंचायतीसाठी प्रत्येकी एक असे एकूण नऊ अर्ज प्राप्त झाले आहेत तर सदस्य पदासाठी बेडाकुंड ग्रामपंचायतीतुन 4 तर  भगदरी ग्रामपंचायतीतुन 1 असे एकूण 5 नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहेत.अशी माहिती तहसीलदार रामजी राठोड यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad