समता पर्वात ‘अनुसूचित जाती उत्थान; दशा आणि दिशा ’विषयावर कार्यशाळेचे आयोजन
नंदुरबार, दि.29 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत समता पर्व’च्या औचित्याने ‘उत्थान; दशा आणि दिशा ’या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
समता पर्वाचे औचित्य साधुन 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर, 2022 या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार 30 नोव्हेंबर, 2022 रोजी जिल्ह्यातील अनुसूचित जाती घटकांसाठी कार्य करणारे समाजसेवी कार्यकर्ते, प्रतिनिधी, कर्मचारी वर्ग यांची ‘अनुसूचित जाती उत्थान; दशा आणि दिशा ’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, टोकर तलाव रोड, नंदुरबार येथे होणाऱ्या या कार्यशाळेस सकाळी 11:00 वाजता समाजसेवी कार्यकर्ते, प्रतिनिधी, कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त देविदास नांदगांवकर यांनी केले आहे.