प्रतिनिधी – दिनेश आंबेकर
विक्रमगड : पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील मलवाडा वाकी या गावाचे दृश्य कोणत्या स्विमिंग पूल किंवा वाटरस्पोर्ट्स मधील नाही तर चार पुस्तके शिकायला घरा बाहेर पडलेल्या महाराष्ट्राच्या भावी पिढीची आहेत ही चिमुकली फार- फार तर पहिला दुसरीची आहेत ती वाहनाच्या टुब वर आपला तोल सावरत हा जीवघेण्या प्रवास करीत आहेत…पण जिद्द बघा निसर्गावर मात करून शिक्षण घेण्याची इच्छाशक्ती आज या भावंडांमध्ये दिसली.
मित्रांनो ही दृश्य आहेत पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यामधील वाकी गावची मसा या ठिकाणी जाण्यासाठी हा प्रवास करावा लागतो तसा हा भाग वाडा व विक्रमगड तालुक्या मधील आहे. आदिवासी ग्रामीण भागातील १५० लोकवस्तीचे हे मसा गाव आहे. संपूर्ण पावसाळ्यात या गावाचा संपर्क तुटलेला असतो या गावातील विद्यार्थी व पालकांना वाहनांच्या टुब वापर करावा लागतो. एकीकडे भारत महासत्ता व देश डिजिटल भारत सपना बघतो. एकीकडे ग्रामीण आदिवासी भागातली परिस्थिती भयानक आहे.