जव्हार प्रतिनिधी - दिनेश आंबेकर
जव्हार -पालघरहून जव्हार कडे येणारी एस टी ची बस आणि जव्हार कडून ठाण्याच्या दिशेने जाणारी बस वळणावर एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात आठ प्रवासी जखमी झाले असून त्यातील दोन जणांची प्रकृती गंभीर आहे.
जव्हार-ठाणे ही ठाणे आगाराची बस जव्हार बसस्थानकातून सुटल्यानंतर वाळवंडा येथे पालघर आगाराची पालघर-जव्हार ही बस जव्हारकडे येताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या गंभीर अपघातात दोघांना गंभीर दुखापत तर ६ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.
जव्हार ठाणे रस्त्याला १२ ते १४ किलोमीटर अंतरावर घाट रस्ता असलेल्या वाळवंडा गावानजीक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ जव्हार आगाराच्या बसचा दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला या अपघातात चालकांना गंभीर दुखापत झाली असून एकूण आठ प्रवासी जखमी झाल्या आहेत त्यांना जव्हार येथील पतंग शाह उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले, प्रकृती गंभिर असलेल्या अपघातग्रस्तांला पुढील उपचाराकरिता नाशिक जिल्ह्या रुग्णालयात पाठवले आहे.