मोखाडा प्रतिनिधी माधुरी आहेर यांच्या कडून ....
मोखाडा ...आरोहन' व ए.एस.के.फाउंडेशन या संस्थेच्या वतीने मोखाडा तालुक्यातील पाचघर या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दि ८ आक्टोबर वार शनिवार रोजी मिळत आहे.यावेळी बोलतांना संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक प्रदीप खैरकर यांनी आरोग्य शिबिरामागची भूमिका स्पष्ट करून लोकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले.या शिबिरातून डॉ. अजिंक्य धनगर व डॉ. केकेन यांनी रुग्णांची आस्थेवाईकपणे तपासणी करून औषधोपचार केला.गाव - परिसरतील सुमारे 125 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.
या शिबिरामुळे गावाकऱ्यांना मोफत उपचार मिळाल्याने गावाकऱ्यांनी समाधान व्यक्त करून संस्थेचे आभार मानले.
शिबिराच्या यशस्वितेसाठी आरोहन संस्थेचे प्रकल्प अधिकारी अंबर पारधी,संघटक उत्तम गवते व मंगल गारे यांनी मेहनत घेतली.