याबाबत सविस्तर माहिती अशी, मौजे कंकराळा येथील शेतकरी मोतीलाल हिराचंद घुसिंगे हे शेतीचा सातबारा व खाते उतारा घेण्यासाठी दि.३ सोमवारी सोयगाव येथील तलाठी कार्यालयात तलाठी पवार यांच्याकडे सातबारा व खाते उतारा घेण्यासाठी आले असता तलाठी यांनी लॅपटॉप खराब आहे तुम्ही चार वाजता या मी देतो असे शेतकऱ्यास सांगितले . मात्र शेतकऱ्यास शंका आल्याने ते कार्यालयातच बसून राहिले थोड्या वेळाने त्याठिकाणी चार,पाच शेतकरी सातबारा व खाते उतारा काढण्यासाठी आले असता तलाठ्याने शेतकऱ्यांना उद्देशून रिकाम चोट आहे साल्याना काही काम नाही असे अपमानास्पद शब्द वापरले. हे शब्द शेतकरी मोतीलाल घुसिंगे यांच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी तलाठ्यास याचा जाब विचारला असता जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी व तलाठ्यात शाब्दिक चकमक झाली.अखेर शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिलीप मचे यांनी मद्यस्थी केली. मात्र शेतकऱ्यांपोटी तलाठी पवार यांनी वापरलेले शब्द व अपमानास्पद दिलेली वागणूक या प्रकरणी तलाठ्यांवर कारवाई करण्याची मागणी व कारवाई न झाल्यास तहसिल कार्यालयावर शिंगाडे मोर्चा काढण्याचा इशारा तहसीलदार यांच्याकडे मोतीलाल घुसिंगे या शेतकऱ्याने दिलेल्या लेखी निवेदनात केला आहे. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. मात्र तहसीलदार तलाठ्यांवर काय कारवाई करतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
गेल्या एक दीड महिन्यापासून महा ई सेवा केंद्रावर सातबारा व खाते उतारा मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहे. सातबारा व खाते उतारा तलाठ्याकडे मिळत असल्याने तलाठी कार्यालयात वेळेवर हजर राहत नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भटंक्ती करावी लागत असून आर्थिक भुदंड सोसावा लागत आहे. तहसीलदार सुस्त असून त्यांचा तलाठ्यांवर कोणताही अंकुश राहिलेला नाही व तलाठी तहसीलदाराना जुमानत नसल्याने तलाठी मुख्यालयी राहत नसून ये-जा करीत आहे त्यामुळे ते कार्यालयात वेळेवर येत नाही काहींना उशीर झाला तर मिटिंगचे नाव सांगून वेळ मारून नेतात तर काही तलाठी वेळे आधीच दांडी मारीत असल्याने शेतकरी सातबारा व खाते उतारा काढण्यासाठी मेटाकुटीस आला आहे. शेतकऱ्यांची पीडा कोण समजून घेणार हे मात्र निरुत्तरीत आहे.