शुक्रवार, दिनांक ०७ ऑक्टोबर २०२२ येथे अनंत मंगल कार्यालय, फलटण येथे तसेच पुरुष व महिला दोहोंसाठी महाराजा मालोजीराव नाईक निंबाळकर सिल्व्हर ज्यूबिली हॉस्पिटल, फलटण येथे मोफत हृदयरोग तपासणी, मोफत अँजिओग्राफी, मोफत अँजिओप्लाष्टी झाली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे: मा. डॉ.सुरेशबाबा भोसले (कुलपती, कृष्णा युनिव्हर्सिटी, चेअरमन-कृष्णा सहकारी साखर कारखाना), तसेच मा.सौ.उत्तरा भोसले (वहिनीसाहेब)
प्रमुख उपस्थिती: श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर (ताईसाहेब), श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा), श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर(बाळराजे),श्री.भोजराज नाईक निंबाळकर, डॉ. बाळासाहेब शेंडे,श्री.शंकरराव सोनवलकर साहेब, डॉ. पार्श्वनाथ राजवैध, डॉ.राऊत सर, डॉ.गांधी सर ,श्री.महेशदादा ढवळे, डॉ.सागर निकम सर, श्री.भीमदेव बुरुंगले सर ई. मान्यवर उपस्थित होते,
मा.डॉ.सुरेशबाबा भोसले यांनी स्त्रीरोगासंबंधी महिलांना मार्गदर्शन केले तसेच फलटण तालुक्यासाठी आरोग्यसेवा संबंधित मदत(सेवा) करण्यासाठी पुर्वी प्रमाणेच भविष्यातही आम्ही सदैव तत्पर राहणार अशी ग्वाही दिली..!