दिनांक 19 .10. 2022
काही दिवसापासून परभणी जिल्ह्यातील सेलू तालुका येथील सर्व मंडळात सर्व ठिकाणी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेली पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही .आसमानी संकटातून शेतकऱ्याला वाचण्यासाठी शासनाने पीक विमा व ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 100000 रुपये मदत जाहीर करावे ही मदत कोणत्याही निकष अटी व पंचनामे न करता मदत जाहीर करून तत्काळ शेतकऱ्यांना खात्यावर वर्ग करावी. जोपर्यंत ही मदत शासन जाहीर करत नाही तोपर्यंत तालुका सर्व शेतकऱ्यांच्या वतीने दिनांक 18. 10.2022 मंगळवारपासून उपोषण करण्यात येणार आहे हे उपोषण साखळी पद्धतीने असेल .