फक्त कागदांवर टाकरखेडा संभु हागणदारी मुक्त,
गावातील काही भाग देतोय रोगाला आमंत्रण
भातकुलीं - प्रतिनिधी वैभव भूजाडे
गावाला 6 ते 7 वर्षा अगोदर हागणदारीमुक्त चे प्रमाणपत्र मिळाले.पण वास्तविकता ही काही वेगळी दिसून येते.
गावातील स्मशानभूमी कडे जाणारा रस्त्यानं प्रचंड प्रमाणात घान असते . आज सुद्धा लोक रस्त्यावर शौचास जातात. त्यामुळं स्मशानभूमी कडे जात असताना प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागतो .पण गावातील ग्रामपंचायत ने त्याकडे एकदा सुद्धा लक्ष दिले नाही. कारण कागदावर हागणदारी मुक्त झाले आहे.
त्यामुळं शासनाची एक प्रकारे फसवणूक स्थानिक प्रशासनाने केली अस म्हणता येईल.