अर्धापूर : नांदेडचे खासदार दाजी भाऊजी असतांना रेल्वेचा एकही प्रश्न सोडऊशकले नाहीत असा टोला खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व माजी खा.भास्करराव खतगावकर यांना लगावला. तर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना जिल्ह्यातील अनेक गावेच माहीत नाहीत मी स्वतःला भाग्यवान समजतो कि मला अंत्यविधी, भंडारा प्रत्येक कार्यक्रमास गावाला भेट देण्याचा प्रयत्न करतो असे खा.चिखलीकर म्हणाले पत्रकारांशी बोलतांना वक्तव्य केले आहे .
२०१४ मध्ये शिवसेनेच्या एक शिष्टमंडळा युती तोडून सत्ता स्थापनेचा प्रस्ताव घेऊन आले होते. त्या शिष्टमंडळात विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ही होते असा गौप्पस्फोट माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केला. याबद्दल नांदेडचे खा. प्रतापराव चिखलीकर म्हणाले की माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आठ वर्ष गप्प का होते. आज चव्हाण हे सत्तेच्या बाहेर गेलेत सत्तेवर राहण्याची सवय काँग्रेसच्या व त्यांच्या अंगी आली आहे असे वक्तव्य करत आहेत असे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर अर्धापूर येथे पत्रकारांशी बोलतांना वक्तव्य केले आहे.
अर्धापूर तालुक्यातील कार्यक्रमात दि.२७ रोजी कार्यक्रमात बोलतांना नांदेडचे खासदार भंडाऱ्याला व अंत्यविधीला जातात अशी टीका माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत आ.अमरनाथ राजूरकर यांनी केली होती. त्याचे प्रत्युत्तर खा. प्रतापराव पाटील चिखलकर यांनी अर्धापूर येथे आले असता २९ रोजी दिले. पैशाच्या जीवावर राजकारण करणारे दुसऱ्याला बोट दाखवतात त्यांना कोणाच्या मौतीला व भंडारा आदी कार्यक्रमास जायची गरज वाटत नाही त्यांच्याबद्दल अधिक बोलण्याची गरज नाही. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला भंडाऱ्याला अंत्यविधीला प्रत्येक गावाला भेट देण्यास प्रयत्न करतो. दाजी भाऊजी खासदार असताना रेल्वेचा एकही प्रश्न सोडू शकले नाहीत.तर मी खासदार असताना राजाराणी रेल्वे सुरू केली. मुख्य मुख्यमंत्री झाले पण एक किलोमीटरचा नॅशनल हायवे सुद्धा करता आला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार व केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे ३८६ किलोमीटर जाळे तयार करत आहेत.यासाठी ६ हजार कोटीची कामे भारत सरकारने केली आहे.असे खा.चिखलीकर म्हणाले.
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा अशी आम्ही ऑफर दिली होती. व महाराष्ट्रभर त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा का होत आहे. पण माझा भाजपशी काही संबंध नाही मी भाजपमध्ये प्रवेश करणार नाही असे स्पष्टीकरण अशोकराव चव्हाण का देत नाहीत याचा अर्थ जनतेने समजून घ्यावा असे वक्तव्य खा.चिखलीकर यांनी अर्धापूर येथे यावेळी केल्याने पुन्हा अशोकराव चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा जोर धरत आहे.यावेळी जेष्ठ नेते धर्मराज देशमुख,भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अँड.किशोर देशमुख,भाजप तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी,जिल्हा चिटणीस डॉ.लक्ष्मण इंगोले,भाजप गटनेते बाबुराव लंगडे,बाबुराव हेंद्रे,शहराध्यक्ष विलास साबळे,भाजयुमोचे तालुकाध्यक्ष जठन मुळे,सरचिटणीस तुळशीराम बंडाळे,विद्यार्थी जिल्हाध्यक्ष आदित्य शिरफुले,माजी सरपंच अशोक बुटले,सरचिटणीस अवधूत कदम, सुधाकर कदम,जिल्हा उपाध्यक्ष
आनंद वैदे,चिटणीस अमोल कपाटे यावेळी आदी उपस्थित होते.