भोये परिवाराचा ‘देव बाहेर’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न
पालघर प्रतिनिधी – दिनेश आंबेकर
विक्रमगड : पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील खोस्ते गावामध्ये ‘देव बाहेर’ कार्यक्रम ३/१०/२२ ते ४/ १०/ २०२२ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आजही ग्रामीण भागात घटस्थापनेच्या मुहूर्ती पाचव्या माळीला हा कार्यक्रम आयोजित केला जातो. आदिवासी भागामध्ये ‘कुलदैवत बाहेर काढणे’ हा कार्यक्रम घटस्थापनेच्या मुहूर्तावर आयोजित केले जात आहे.
यामध्ये हिरवा देव व आदी विविध आदिवासी देवतांचे रात्रभर जागून जागरण व पूजन केले जाते. खोस्ते गावामध्ये झालेल्या या कार्यक्रमात आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त भाग घेतला. आदिवासी ग्रामीण भागात घटस्थापनेच्या सहाव्या माळी ‘डांगर’ या भाजीचा नैवेद्य सुद्धा दाखवले जाते.
विक्रमगडमध्ये ग्रामीण आदिवासी भागात ‘देव बाहेर’ काढणे असे कार्यक्रम मोठ्या उत्साहात आजही साजरे केले जातात. आदिवासींची पूर्वजापासून चालत आलेली ही परंपरा चालू आहे. पालघर विक्रमगड वाडा मोखाडा नाशिक इतर तालुक्यातील भोये परिवार कार्यक्रमाला उपस्थित होते. देव बाहेर काढणे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.