Type Here to Get Search Results !

शांततेच्या मार्गाने ऊस दरवाढीसाठी आंदोलन सुरू आहे वेळप्रसंगी चेअरमनच्या गाड्या माळशिरस तालुक्यात फिरू देणार नाही - शिवराम गायकवाड




शांततेच्या मार्गाने ऊस दरवाढीसाठी आंदोलन सुरू आहे वेळप्रसंगी चेअरमनच्या गाड्या माळशिरस तालुक्यात फिरू देणार नाही - शिवराम गायकवाड

ऊसदर संघर्ष समितीच्या आंदोलनाची ठिणगी पडली

नेवरे प्रतिनिधी :




सध्या माळशिरस तालुक्यासह जिल्ह्यातील बऱ्यापैकी कारखाने सुरू झालेले आहेत आणि दुसरीकडे सर्व शेतकरी संघटना एकत्र येऊन सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळविण्यासाठी वेगवेगळ्या भागात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकत्रित घेऊन आंदोलन करत आहेत
      सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेले सर्व कारखाने २९०० ते ३३०० रुपयांपर्यंत दर मिळतो पण सोलापूर जिल्ह्यातील कारखानदार ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना जाणीवपूर्वक दिला जात नाही  
    कोल्हापूरच्या धर्तीवर ३१००/- रुपये प्रति टन उसाला दर मिळावा असा ठराव २३ ऑक्टोंबर २०२२ रोजीच्या शिवतीर्थ पंढरपूर येथील ऊस परिषदेत एकमताने मंजूर करण्यात आला या ऊस परिषदेत सामील झालेल्या शेतकरी संघटनेतील नेत्यांनी आक्रमक होऊन शेतकऱ्यांना उसाला योग्य भाव मिळवण्याची भूमिका मांडली
   सोलापूर जिल्हा ऊस संघर्ष समिती आंदोलनाचा भडका म्हणून माळशिरस तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या न्याय हक्कासाठी स्वाभिमानीचे शिवराम गायकवाड यांनी नेवरे येथे उसाने भरलेला ट्रॅक्टर आडवून ट्रॅक्टर चालकाला टोपी टॉवेल हाप आहेेर करून हार घालून हात जोडून कारखान्यांनी उसाच्या दर जाहीर करेपर्यंत ऊस वाहतूक न करण्याची विनंती केली आजपासून शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू केले आहे परंतु वेळप्रसंगी पुढील आंदोलन टॅक्टरचे टायर फोडण्याचे नसून चेअरमनच्या गाड्या फोडण्याचे असेल असा ईशारा यावेळी देण्यात आला यावेळी विद्यार्थी आघाडी प्रमुख शिवराम गायकवाड,सिराज तांबोळी,कमलेश कागदे, दिपक सावंत, बच्चन साठे यांच्यासह नेवरे परिसरातील शेतकरी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad