Type Here to Get Search Results !

अकोला शहर व जिल्ह्यातील सर्व बिअर बार बंद! बारमालकावर प्राणघातक हल्ला




 अकोला शहर व जिल्ह्यातील सर्व बिअर बार बंद! बारमालकावर प्राणघातक हल्ला

कुशल भगत अकोट

शहरातील गीता नगर परिसरात असलेल्या एका बिअर बार संचालकावर समाजकंटकांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे दहशत निर्माण झाली आहे. या हल्यात बारमालक गंभीरपणे जख्मी झाले आहेत. या घटनेतील आरोपींना तातडीने अटक करावे, या मागणीसाठी व घटनेचा निषेध म्हणून उद्या शुक्रवार २८ रोजी जिल्ह्यातील सर्व बिअर बार बंद राहणार आहेत.
जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील गीता नगर येथील हॉटेल न्यु नितीन बिअर बारचे संचालक नितीन शहाकार यांच्यावर २६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास ग्राहक म्हणुन आलेल्या गुंड प्रवृत्तीचे ४ ते ५ लोकांनी प्राणघातक हल्ला केला. मारहाण करून खंडणीची मागणी केली. या हल्यामध्ये जखमी झालेले शाहकार यांना आयकॉन हॉस्पीटलमध्ये आय.सी.यू. मध्ये दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असून याबाबत रीतसर तक्रार जुने शहर पोलीस स्टेशनला दिली.

मात्र गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी व त्यांच्या साथीदारानी हॉस्पीटलमध्ये येवून तक्रार मागे घ्या अन्यथा, यावेळेस प्राण वाचले पुढच्या वेळेस प्राण वाचणार नाही. अशी धमकी देखील दिली. त्याचा सुध्दा रामदासपेठ पोलीस स्टेशनला रात्री तकार दाखल केली. असे निवेदनात म्हटले आहे. घटनेतील हल्लेखोरावर कडक कारवाई व्हावी, याकरीता आज गुरुवार २७ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व उत्पादन शुल्क अधीक्षक यांना बार मालक व संचालकांनी निवेदन दिले.
या घटनेचा निषेध म्हणुन एक दिवस अकोला जिल्ह्यातील सर्व बिअर बार बंद ठेवण्याचा निर्णय बार असोसिएशनने घेतलेला आहे.त्या निर्णयानुसार उद्या शुक्रवार २८ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील सर्व बिअर बार बंद ठेवण्यात येणार असल्याचे अकोला जिल्हा वाईन व बियर बार असोसिएशनने कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad