कपाशीला राज्यातील सर्वाधिक दर देणारी बाजार समिती म्हणुन अकोटची ओळख
अकोट प्रतिनिधी :- कुशल भगत
विदर्भातील कापसाची पंढरी अशी ओळख असलेल्या अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमद्ये या हंगामातील कपाशी खरेदीला आजपासून सुरवात झाली असून आज कपाशी खरेदी मुहूर्तावर बैलगाडीमध्ये आणलेल्या कपाशीला 9 हजार 111 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कपाशी विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचा दुपट्टा टोपी घालून सन्मान केला. खरेदी मुहूर्तावर आज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी बैलगाडी व ट्रॅक्टर मधून कपाशी विक्रीसाठी आणली असून कपाशीची मोठया प्रमाणात आवक आहे.
मागिल वर्षी अकोट बाजार समितीमध्ये विक्रमी 5 लाख 46 हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली होती.राज्यातील सर्वाधिक दर देणारी बाजार समिती म्हणुन अकोट बाजार समितीची ओळखं असून मागिल हंगामात बाजार समितीमधे राज्यातील सर्वाधिक 14 हजार 950 रूपये विक्रमी दर मिळाला होता.त्यामुळे येथे अकोला, अमरावती, बुलडाणा, अमरावती जिल्ह्यासह मध्यप्रदेशतील शेतकरी कापूस विक्रीसाठी घेउन येतात.बाजार समितीत जाहीर लिलाव पद्धतीने व्यापारी कपाशीची खरेदी करतात. त्यामूळे येथे मिळणारा दर हा नेहमीच अधिक असतो त्यामूळे कपाशीची गुणवत्ता, कापसाची मागणी व शेतकऱ्यांचा विश्वास यामुळे अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमधे बळीराजाच्या पांढऱ्या सोण्याला विक्रमी दर मिळत असल्याचा आशावाद शेतकऱ्यांनी व्यक्त केला.