Type Here to Get Search Results !

सोलापूर | ऊस दर संघर्ष समितीने सोलापूर जिल्हा आरटीओ कार्यालयामध्ये स्वतःला घेतले कोंडून




ऊस दर संघर्ष समितीने सोलापूर जिल्हा आरटीओ कार्यालयामध्ये स्वतःला घेतले कोंडून

आरटीओचे अधिकारी कारवाई करत नसून कारखानदाराशी आर्थिक हितसंबंध जोपासत आहेत याच्या निषेधार्थ ऊस दर संघर्ष समिती आक्रमक झालेली असून सहाय्यक पोलीस परिवहन अधिकारी कक्ष क्रमांक 21 विजय किरण कर यांच्या कार्यालयामध्ये ऊस दर संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्याने स्वतःला घेतले कोंडून

निष्क्रिय आरटीओ अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला जोपर्यंत जिल्ह्यातील सर्व कारखान्यासमोर येणाऱ्या ऊस वाहतूक ट्रॅक्टर व नोंदणी नसलेल्या ट्रॅक्टर बैलगाडी बजेटवर कारवाई होत नाही तोपर्यंत दरवाजा उघडणार नाही व पोलीस बलाचा वापर केला आणि आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला तर ऊस दर संघर्ष समितीचे कार्यकर्ते टोकाचा निर्णय घेतील व होणाऱ्या नुकसानिस आरटीओचे प्रमुख गायकवाड मॅडम व सर्व त्यांचे टीम जबाबदार असेल असे ऊस दर संघटनेचे समन्वयक संजय बाबा कोकाटे यांनी यावेळी जाहीर केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad