जरंडी मंडळात झालेल्या ढगफुटीच्या पावसाने नदी नाले तुडुंब, दुसऱ्या छायाचित्रात धिंगापुर धरण ओव्हरफ्लो, तिसऱ्या छायाचित्रात कपाशी पिकांचे नुकसान
सोयगाव, दि.११.सोयगाव तालुक्यात काही भागात परतीच्या पावसाने मंगळवारी पहाटे चार वाजेपासून विजांच्या तडाख्यात धुमशान घालून जरंडी पट्ट्यात १७ गावात परतीच्या पावसाने मोठा ढगफुटीचा पाऊस झाला आहे.दरम्यान बनोटी,सोयगाव मंडळात मुसळधार तर जरंडी मंडळात ढगफुटीच्या झालेल्या दोन तासांच्या पावसाने कपाशी,मका,या मुख्य पिकांचे मोठे नुकसान केले आहे जरंडी मंडळात वेचणी वर आलेल्या कापसाच्या झाडावरच वाती झाल्या असून,मका पिकांचे नुकसान झाले आहे.
जरंडी मंडळात दोन तास झालेल्या पहाटेच्या पावसाने गारगोटी आणि धिंगापुर ही दोन्ही धरणे ओव्हरफलो झाली असून जरंडी च्या खडकी नदी ला मोठा पूर आला होता मात्र कापूस पिकांचे आगार समजल्या जाणाऱ्या सोयगाव तालुक्यात परतीच्या पावसाने कपाशीचे मोठे नुकसान केले आहे त्यामुळे पाहिक्याच वेचणीत कापूस भिजून वाती झाल्या आहे.दरम्यान खरिपाच्या मका,ज्वारी,बाजरी आदी पिकांना ढगफुटीच्या पावसाचा तडाखा बसला आहे त्यामुळे सोयगाव तालुक्यात ऐन काढणी च्या हंगामात खरीप शेतकऱ्यांच्या हातातून निसटला आहे.
जरंडी मंडळात झालेंक्या दोन तासांच्या ढगफुटीच्या पावसात ठिबक वरील कपाशी पिके आडवी पडून कापूस पूर्णपणे भिजून वाती झाल्या तर मका ऐन कापणी च्या कालावधीत काळवंडलेला झाला आहे.. त्यामुळे खरिपाच्या पिकांचा घास नैसर्गिक संकटांनी हिरावून घेतला आहे
अतिवृष्टीच्या निकषांतुन वगळणी करण्यात आलेल्या सोयगाव तालुक्याला परतीच्या पावसाने चांगलाच झोडपून काढले असल्याने पिकांच्या नुकसानीची मालिका च सुरू झालेली आहे त्यामुळे सोयगाव तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत आला असून,या नुकसानीत तरी सोयगाव चा अतिवृष्टीच्या निकषांत समावेश होईल का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे..सोयगाव तालुक्यात अतिवृष्टी झालीच नसल्याने शून्य टक्के नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केलेला आहे मात्र सोमवारी रात्री झालेल्या पावसाने नुकसानीची तीव्रता जिल्हा प्रशासन समजून घेईल का असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.