कारला येथे घाणीचे साम्राज्य ग्रामस्थांनी ग्रामसेवकास धरले धारेवर
हिमायतनगर प्रतिनिधी जांबुवंत मिराशे
तालुक्यातील कारला पिचोंडी येथील सरपंच ग्रामसेवक व सदस्य यांच्या दुर्लक्षपणामुळे गावामध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून परिणामी नागरिकांना घाणीमुळे गॅस्ट्रो मलेरिया या आजाराची भीती जडावत असून परिणामी ताप सर्दी खोकला या आजाराने अनेक नागरिक जखमी पडत आहेत म्हणून येथील तरुणांनी ग्रामसेवक काळे यांना धारेवर धरून मुख्य रस्त्यावरील घाणीबाबत जाब विचारला असता तात्काळ काम करून देण्याचे आश्वासन उपस्थितांना ग्रामसेवक यांनी दिली