सांगोला तालुक्यातील जुजारपूर या गावांमध्ये गेली पाच ते सहा दिवस झाले जुजारपूर गावालगत असणाऱ्या ओढा पाण्याने भरून वाहत असल्याने ओढ्यालगत व वाडी वस्तीवरील नागरिकांना व शाळेतील मुलांना शाळेत येण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी खालील प्रमाणे नेतेमंडळींना मेसेजचा स्वरूपात आव्हान करण्यात आलेले आहे
"तुकाराम पाटील (शालेय व्यवस्था समिती जुजारपूर")
नेते मंडळी माफ करा
पण जो पर्यंत ओढ्याचे पाणी पूर्ण पणे कमी होत नाही तोपर्यंत कुणीही जुजारपुरला भेट देऊ नका तो कोणत्याही पक्षाचा नेता आसो कारण प्रत्येक जण खोटी आश्वासने देऊन निऊन जाणार आणि आमच्या गावचे नागरीक तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला मतदान रुपी आशिर्वाद देणार तुम्हच्यावर प्रेम करणार आणि तुम्ही....... मात्र निवांत आणि ग्रामपंचायत मध्ये रस्ताची विचारणा केली तर ते म्हणार आमच्या बजेठ मध्ये काम होऊ शकत नाही कारण ते बजेठ मोठ आहे आणि जिल्हा परिषदेचे नेते किंवा आमदार साहेब यांच्या कडे विचारणा किंवा मागणी केली तर यांची उत्तर बघु करुन ठाकू हि आमची आत्तापर्यंत होत असलेली फसवणूक आहे आठ ते दहा दिवस झालेओढ्याला पाणी आले आहे 50% लोकांचा संपर्क बंद आहे आजुन किती महीने हे पाणी रहाणार हे सांगता येत नाही दुध उत्पादक शेतकरी किंवा शाळेची लहान लहान मुले आजारी व्यक्ती आश्या लोकांचे हाल होत आहे.....ज्या ज्या वेळी ओढ्याला पाणी येते त्या त्या वेळी आशी अवस्था होते जर तुम्हची अशी अवस्था किंवा तुम्हच्या गावची अशी परिस्थिती निर्माण झाली तर तुम्ही काय विचार कराल? आहो नेते मंडळी कोणत्या हि एका पक्षाला बोलत नाही सर्वच पक्षाच्या नेत्यांना हे सांगण आहे.
कुणाची गिनीज बुकात नोंद झाली
तर कुणाची काय हॉटेल काय झाडी काय ते डोंगार या डॉयलाँग मध्ये महाराष्ट्र भर चर्चा
आणि आमची मुलं मात्र जिल्हा परिषद शाळेच शिक्षण घेण्या वाचून वंचित रहाण्याची वेळ आली आहे.
केवळ आणि केवळ रस्ता नसल्या मुळे आणिआमच्या पिढ्यानं पिढ्या तुम्हा लोकांचे झेंडे उचलण्यात चालल्या...... जे सुचले ते बोललो मी एक आपल्याच गावचा नागरिक बोलतोय जुजारपुर ग्रामस्थांनो धन्यवाद जागे व्हा