Type Here to Get Search Results !

किनवट | जलधरा आश्रम शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जेवणातून विशबाधा




जलधरा आश्रम शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जेवणातून विसबाधा

किनवट प्रतिनिधी : गजानन वानोळे




किनवट तालुक्यातील जलधरा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत घडली घटना..

आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील. जलधारा शासकीय आश्रमशाळा येथे घडलीय... विषबाधा झाल्याची घटना कळताच पालकांनी रोष व्यक्त केलाय




आदिवासी मुलामुलीना दर्जेदार शिक्षण मिळाव म्हणून केंद्र शासनाकडून निवासी आदिवासी आश्रमशाळा चालवल्या जातात मात्र अशा आदिवासी आश्रम शाळेतील जवळवपास 30 ते 35 मुला मुलींना डोकेदुखी व मळमळ अशा प्रकारचा किरकोळ त्रास जाणवला व आकरा विद्यार्थ्यांना मळमळ उलटी होऊन पोटात दुखून चकरा येत असल्याने त्यांना जलधरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात व हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

सदरील घटनेमध्ये दिव्या विलास ढोले, दिव्या बालाजी ढोले, सरीता विठ्ठल ढोले. वैष्णवी ज्ञानेश्वर मिराशे. वंदना मारोती डुकरे, श्रध्दा देविदास शेळके. ओमसाई शंकर ढाले. दिव्या रामदास मेंडके, काजल शंकर तांबारे, चांदणी मेंडके, जयश्री डुडूळे, असे अकरा विद्यार्थ्यांना विषबाधा झालेल्याची नावे असुन.

हा विषबाधा कशामुळे झाला अद्याप स्पष्ट झाले नाही.
मात्र विद्यार्थ्यांना प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवल्याची माहिती जलधरा येथिल वैद्यकीय अधिकारी गौतम नरवाडे यांनी दिलीय...


सदरील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक जिल्हाधिकारी पुजार यांनी तात्काळ प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी मनोज तिले व तालुका आरोग्य अधिकारी संजय मुरमुरे आरोग्य विभागाच्या टिम सह आश्रम शाळेवर हजर झाले.
हा विषबाधा कशामुळे झाला व का झाला याचा फुड तपासणी केल्यानंतरच सांगता येईल असे त्यांनी यावेळी सांगितले..
या घटनेची माहिती जलधरा येथिल नवनिर्वाचित सरपंच वैशाली अनिल पाचपुते यांना मिळताच त्यांनी देखील भेट देऊन विषबाधा विद्यार्थ्यांची विचारपूस केलीय...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad