Type Here to Get Search Results !

वाशीच्या जंगलात दगडाने ठेचून युवकाचा खून; नरबळीचा प्रकार असल्याचा नातेवाईकांचा संशय




वाशीच्या जंगलात दगडाने ठेचून युवकाचा खून; नरबळीचा प्रकार असल्याचा नातेवाईकांचा संशय


उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर पोलिसांकडून तपास आहे सुरु    


हिमायतनगर, प्रतिनिधी जांबुवंत मिराशे/
शहरातील एका युवकाचा तेलंगणा बॉर्डरवर असलेल्या वाशीच्या जंगलच्या भागात पांडुरंग लक्ष्मण तोटेवाड हा मृतावस्थेत आढळून आला आहे. त्याच्या चेहरा छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आल्याने निर्घुर्णपणे दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे दिसते आहे. याबाबत दिलेल्या तक्रारीवरून हिमायतनगर पोलिसांनी एका महिलेसह तीन पुरुष अश्या ४ आरोपीवर कलम ३०२, ३४ भादंवि अनुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर शहरातील युवक पांडुरंग लक्ष्मण तोटेवाड वय ३२ वर्ष रा.लाकडोबा चौक याचा मृतदेह हिमायतनगर - तालुक्यातील तेलंगणा बॉर्डरवर असलेल्या वाशीच्या जंगलात दि.०८ सप्टेंबर रोजी ३ वाजेच्या सुमारास छीन्नविछीन अवस्थेत आढळून आला. मयत युवक हा आपल्या घराशेजारी बसलेला असताना आरोपीतानाही त्याला काहीतरी अमिश दाखउन बोलावून नेले. आणि त्यास वाशीच्या जंगलच्या भागात घेऊन जाऊन इतर साथीदाराच्या मदतीने निर्घुर्णपणे दगडाने ठेचून खून केला. हा प्रकार लक्षात येऊ नये म्हणून हा अपघात असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता असे नातेवाईकांनी सांगितले आहे.

खरे पाहता जंगल भागात मयत युवकांच्या चेहऱ्याची परिस्थिती पाहता मयत युवकांचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे निदर्शनास येते. याबाबत बालाजी तोटेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यातील आरोपीतांनी जुन्या वादाच्या कारणावरून खून केला. अशी फिर्याद दिल्यावरून आरोपी परमेश्वर लक्ष्मण अक्कलवाड, लक्ष्मण अक्कलवाड, रमेश लक्ष्मण अक्कलवाड, लक्ष्मीबाई लक्ष्मण अक्कलवाड यांनी संगनमत करून खून केल्याप्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात कलम 302, 34 भादवी अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मयत युवकाचा छिन्नविछिन्न अवस्थेतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, सदरील व्हिडीओ कुणी काढला, कसा व्हायरल झाला, त्या मृतदेहाच्या शेजारी लिंब, तांब्या आणि फुले दिसत असल्याने हा प्रकार नरबळीचा असल्याची चर्चा व आरोप नातेवाइकांसह घटनास्थळावर गेलेल्या नागरीकातून केला जात आहे. दरम्यान आज सकाळी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून, खुनाच्या घटनेचा कसून तपास केला जात आहे. पोलीस निरीक्षक बी डी भुसनूर, जमादार हेमंत चोले, अशोक सिंगणवाड यांच्यासह इतर पोलीस अधिकारी कर्मचारे घटनास्थळावर तपास कामी गेले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad