Type Here to Get Search Results !

कामगार सेना जिल्हाप्रमुख सुरेश लोटे यांचा भाजपात प्रवेश




कामगार सेना जिल्हाप्रमुख सुरेश लोटे यांचा भाजपात प्रवेश

नांदेड प्रतिनिधी जांबुवंत मिराशे

शिवसेना प्रणित भारतीय कामगार सेना जिल्हाप्रमुख सुरेश लोट यांनी शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीला कंटाळून खा. प्रतापराव पाटील चिखलीकर व जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला असून शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे.

गेल्या आठ वर्षापासून नांदेडमध्ये अनेक कारखाने आणि वाणिज्य व्यवस्थापनामध्ये पहिल्यांदाच कामगार सेनेचा प्रवेश सुरेश लोट यांच्यामुळे झाला होता. त्यांच्या कार्यामुळे अनेक कामगार शिवसेनेचे सभासद झाले होते. पण शिवसेना फुटल्यामुळे कामगारांचा भ्रमनिराश झाला. नांदेडमध्ये देखील शिवसेनेत गटबाजी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे खा.चिखलीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय सर्वांनी घेतला. खा. चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेशाच्या वेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. संतुकराव हंबर्डे, दिलीप कंदकुर्ते, ॲड. चैतन्यबापू बाळू खोमणे, संघटन सरचिटणीस विजय गंभीरे, जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर सोशल मीडिया जिल्हा संयोजक राज यादव व सहसंयोजक अक्षय अमीलकंठवार, सुनील रामदासी हे उपस्थित होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या सेवा पंधरवड्यात कामगारांचे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा मनोदय सुरेश लोट यांनी यावेळी व्यक्त केला. सुरेश लोट यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याबद्दल अनेक नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad