तब्बल ७ दशकांनंतर भारतातून नामशेष झालेल्या चित्त्याचं मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आज सकाळीच आगमन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांच्या ७२व्या वाढदिवसानिमित्त या चित्त्यांना १० किलोमीटर पसरलेल्या भागात सोडले.
(फोटो सौजन्य : एएनआय)
आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त नामिबियामधून ८ चित्ते भारतात आणण्यात आले आहेत. या आठ चित्त्यांमध्ये ५ नर आणि ३ मादी चित्ते आहेत. मध्य प्रदेशातल्या कुनो अभयारण्यात पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत या चित्त्यांना सोडण्यात आलं आहे.
यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यावरही 'उद्धव ठाकरे फीवर' दिसून आला. उद्धव ठाकरे फीवर म्हणण्यामागचा उद्देश म्हणजे नरेंद्र मोदी यावेळी स्वतः हातात कॅमेरा घेऊन या चित्त्यांचे फोटो काढताना दिसले. उद्धव ठाकरेंची फोटोग्राफीची आवड तर सर्वश्रुतच आहे.