यवतमाळ प्रतिनिधी:- संजय जाधव उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष उमरखेड जिल्हा यवतमाळ यांच्या माध्यमातून उमरखेड तालुक्यातील कृष्णापुर ग्रामपंचायत अंतर्गत कृष्णापुर तांडा येथे 9 समूहाचा मिळून वसंतराव नाईक महिला ग्रामसंघ स्थापन करण्यात आले समूहामध्ये कृष्णापुर येथील 91 कुटुंब जोडून ग्रामसंघ स्थापन करण्यात आला आहे
कृष्णापुर ग्रामपंचायत अंतर्गत कृष्णापुर तांडा मध्ये उमेद महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोतींना अभियान तालुका अभियंता कक्ष उमरखेड अंतर्गत कृष्णापुर तांडा येथील महिला ग्रामसंघ तयार करण्यात आला उमरखेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोविड काळामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला ब्रेक लागले होते पण 2022 पासून मोठ्या प्रमाणात उमरखेड तालुक्यात उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे महिलांचा जीवनमान उंचवण्यासाठी व त्यांना हक्काचा व्यासपीठ मिळण्यासाठी नेहमीच उमरखेड तालुक्याचे उमेद चे तालुका अभियान व्यवस्थापन रामदास इटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उमेद चे सर्वच कर्मचारी मेहनत घेत आहे कृष्णापुर तांडा येथील कार्यक्रमाला राळेगावचे प्रभाग समन्वयक दिनेश कोवे निंगनूर प्रभागाचे सी एल एम धम्मपाल इंगोले , आय. सी. आर. पी .हर्षा राठोड. पशु सखी सुषमा राठोड .ग्राम संघ अध्यक्ष विद्या हरिचंद्र राठोड उपस्थित होते यांच्या उपस्थित ग्राम संघ तयार करण्यात आला