Type Here to Get Search Results !

उमरखेड तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेच्या ढिसाळ नियोजना विरोधात पुरोगामी युवा ब्रिगेड चा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा




उमरखेड तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेच्या ढिसाळ नियोजना विरोधात

पुरोगामी युवा ब्रिगेड चा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
   
आरोग्य विभागाच्या असंवेदनशील कारभारा विरोधात तरुणांचा एल्गार ; 




उमरखेड/प्रतिनिधी :
       उमरखेड तालुक्यातील आरोग्य विभागाने असंवेदनशीलतेचा कळस घातला असून विडुळ चे नवजात मृत्यू प्रकरण हे त्याचे ताजे उदाहरणं आहे.या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी आणि अन्य मागण्यांसाठी पुरोगामी युवा ब्रिगेड तर्फे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयावर विडुळ येथील नवजात मुलाचे नातेवाईक धर्मा हपसे यांच्या नेतृत्वात धडक मोर्चा काढण्यात आला.
   तालुका आरोग्य अधिकारी यांच्या समक्ष जिल्हा अधिकारी यांना विविध महत्वपूर्ण मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून यामध्ये भविष्यात उमरखेड तालुक्यातील कुठल्याच आरोग्य केंद्रात वा उपकेंद्रात विडुळ सारखी घटना घडू नये यासाठी आरोग्य व्यवस्था तत्पर ठेवावे,
 उमरखेड चे उपजिल्हा रुग्णालय लवकरात लवकर सुरु करण्यात यावे, उपजिल्हा रुग्णालयात ब्लड बँक सुरु करण्यात यावी, उमरखेड परिसरातील व बंदिभागातील सामान्य जनतेस मोफत,दर्जेदार व तात्काळ आरोग्य सेवा देण्यात यावी, आरोग्य कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहता यावे यासाठी राहण्यालायक सुसज्ज असे शासकीय कॉर्टर देण्यात यावे किंवा बांधकाम करून देण्यात यावे, कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांऐवजी शासकीय रिक्त पदे भरण्यात यावे. किंवा कंत्राटी कर्मचाऱ्यांनाच शासकीय सेवेत समावुन घ्यावे , कुटीर रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण होत असून रुग्णांना बाहेरून औषधी घ्यावी लागत आहे. सर्व प्रकारच्या प्राथमिक औषधांची उपलब्धता व्हावी. आदी मागण्यांसाठी पुरोगामी युवा ब्रिगेड तर्फे धडक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मागण्यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेतले जाईल असे आश्वासन तालुका आरोग्य अधिकारी यांनी दिले.
     यावेळी पुरोगामी चे जिल्हाध्यक्ष शिवशंकर सुरोशे, परमेश्वर रावते, विनोद वाढवे, आतिश वटाणे, अनिल हरणे, सुनील लोखंडे, अमर लोमटे, प्रफुल्ल दिवेकर, अतुल वाढवे, गजानन गायकवाड, जावेद शेख, दीपक पडघने, ज्ञानेश्वर लोखंडे, शुभम जवळगावकर, दत्ता दिवेकर, अंबादास गव्हाळे, निकेश गाडगे, इरफान शेख, मुक्तार शाह या मोर्च्यास मूलभूत अधिकार समिती चे प्रशांत खंदारे, राजू गायकवाड व मैत्री परिवाराचे अभी ठाकूर यांनी पाठिंब्याचे पत्र दिले.


" उमरखेड तालुक्याच्या जवळपास प्रत्येक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात आरोग्य सुविधाचा अभाव आहे. रुग्ण आल्यावर वेळेवर उपचार मिळत नाही. डॉक्टर कर्मचारी उशिरा येतात. जिल्हा रुग्णालय असून सुद्धा सुविधा कुठल्याच नाहीत. शासकीय रुग्णालयात रुग्ण आल्यावर ट्रीटमेंट न करता काही डॉक्टर व कर्मचारी तर चक्क खाजगी दवाखान्यात पाठवण्याचा आग्रह धरतात. उमरखेड सारख्या शहराच्या आरोग्य विभागाची ही अवस्था असेल तर खेड्यातील गरीब मायबाप्पानी जायचं तरी कुठं? " 

परमेश्वर रावते
तालुका उपाध्यक्ष तथा
ग्रामपंचायत सदस्य सावळेश्वर
पुरोगामी युवा ब्रिगेड 




"देश आजादी चा अमृत महोत्सव साजरा करत असतांना विडुळ सारखी घटना घडते. हे अत्यंत दुर्देवी आहे. आज ही वेळ त्या महिलेवरआली, भविष्यात कुणावर येऊ नये यासाठी पुरोगामी युवा ब्रिगेड च्या माध्यमातून आरोग्य व्यवस्थेविरोधात आवाज उठवने मला महत्वाचे वाटले "

राजू गायकवाड
मोहदरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News