Type Here to Get Search Results !

तिसऱ्या वर्गात शिकणारा इंद्रकुमार मेघवाल या बालकाची मटक्यातील पाणी पिल्यामुळे जातीय द्वेषातुन हत्या करणाऱ्या छेल सिहंला फाशीची शिक्षा द्यावी - भिम आर्मीचे निवेदन




वसमत :- तिसऱ्या वर्गात शिकणारा इंद्रकुमार मेघवाल या बालकाची मटक्यातील पाणी पिल्यामुळे जातीय द्वेषातुन हत्या करणाऱ्या छेल सिहंला फाशीची शिक्षा द्यावी तसेच भिम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष ऍड भाई चंद्रशेखर आझाद यांना सूडबुद्धीने अटक केल्याच्या निषेधार्त महामहिम राष्ट्रपती भारत सरकार यांना उपविभागीय अधिकारी वसमत यांच्या मार्फत भिम आर्मीचे निवेदन.




एकीकडे 75 वा भारत स्वतंत्र आझादीचा अमृत मोहोत्सव साजरा होत असताना सुराणा जालौर राजस्थान येथील इंद्रकुमार मेघवाल या 9 वर्षीय चिमुकल्यावर केवळ शिक्षक वर्गाच्या मटक्यातून पाणी पिल्यामुळे केलेल्या अमानवीय मारहाणी मुळे त्या बालकाची कानाची नस फाटल्या जाते, एक हाथ आणि एक पाय निकामी केल्या जातो आणि शेवटी त्याच्या जीवनाशी असलेली त्याची झुंज संपते. मानवजातीला विशेषत हा पालक वर्गाला सुन्न करणारी हा प्रकार प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.आज स्वातंत्र्याचे 75 वर्षे लोटली तरी काय मनुवादी विचारसरणीचे लोक या रूढीवादी जाती प्रथेच्या पारंपरिक परंपरे पासून मुक्त झालेले आहेत.वरील झालेला प्रकार निंदनीय असून माणुसकीला काळीमा फासणारा आहे सदर पीडित परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी भिम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष ऍड भाई चंद्रशेखर आझाद सुराणा जालौर येथे जात असतांना तेथील अशोक गलोहत सरकारने सूडबुद्धीने अटक केली आहे.






तेव्हा राष्ट्रपती महोदया आपणास या निवेदनाद्वारे भीम आर्मी हिंगोली जिल्हा आमच्या मागण्या जाहीर करतेय कटाक्षाने लक्ष पुरवावे.1) मारेकरी छेल सिहं यास फाशीची शिक्षा द्यावी.
2)पीडित परिवारास एक करोड रुपये आर्थिक मदत द्यावी.
3)सदर परिवारातील एकास शासकीय नौकरी द्यावी.
4)कार्यवाही करण्यास दिरंगाई करणाऱ्या पुलिस प्रशासनातील अधिकारी यांना सेवेतून बडतर्फ करावे.
5)भाई चंद्रशेखर आझाद यांची तात्काळ सुटका करावी
वरील सर्व मांगण्याची पूर्तता त्वरित करण्यात यावी अन्यथा भीम आर्मी संस्थापक अध्यक्ष भाई चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वात देशभर आंदोलन उभारल्या जाईल असा इशारा निवेदनाद्वारे संघटनेच्या वतीने देण्यात आला त्यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आनंद खरे, हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष निवृत्ती ढेंबरे, वसमत तालुका प्रमुख किशन खरे, तालुका मार्गदर्शक रवी कुंटे तालुका सोशल मीडिया प्रमुख हर्षद आझादे, बालाजी मस्के सर,सोनू आर्वीकर, रोहिदास साखरे,प्रमोद वाहुळे,संदीप जोंधळे, संजय नांगरे व इतर पदाधिकारी व कार्यकर्त मोठया संख्यने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad