Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खडकी येथे आजादी का अमृत महोत्सव




जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खडकी येथे आजादी का अमृत महोत्सव

कोरपना प्रतिनिधी. मनोज गोरे
कोरपणा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खडकी येथे स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी खडकी गावातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांसाठी निबंध चित्रकला रांगोळी , गीत गायन आदी विविध स्पर्धा घेण्यात आला. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिराम किनाके,
शाळेचे मुख्याध्यापक शत्रुघन तुमराम, शिक्षक दिनेश सम्रितकर आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad